Friday, April 25, 2025
HomeदेशNovember Bank Holidays : बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी जोमात! पाच दिवस बँकांना राहणार...

November Bank Holidays : बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी जोमात! पाच दिवस बँकांना राहणार सुट्टी…

जाणून घ्या बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक

मुंबई : राज्यात दिवाळीच्या सणामुळे (Diwali festival) सारं काही उजळून निघालं आहे. रांगोळ्या, आकाशकंदील, पणत्या, दिवे यांमुळे लखलखाट झाला आहे. बँक कर्मचाऱ्यांना (Banking staff) देखील ही दिवाळी आपल्या घरच्यांसमवेत साजरी करता यावी यासाठी दिवाळीत पाच दिवस सुट्टी राहणार आहे. शिवाय नोव्हेंबर महिन्यातील इतर सुट्ट्या पकडून १५ दिवस म्हणजे जवळजवळ अर्धा महिना बँका (November 2023 Bank Holidays) बंद असणार आहेत. मात्र, या दिवसांत UPI, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवा (Digital Banking) उपलब्ध राहतील.

देशभरातील अनेक राज्यांमध्ये आजपासून पाच दिवस बँका बंद (Bank Holidays) राहणार आहेत. यंदाच्या दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने आज होतेय आणि १५ नोव्हेंबरला भाऊबीजला दिवाळी संपते. आरबीआयच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, शुक्रवारपासून सलग सहा दिवस बँका बंद असतील. त्याशिवाय दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी बँकांची नियमित सुट्टी असणार आहे.

नोव्हेंबरमध्येच, चित्रगुप्त जयंती, दिवाळी, छठ पूजा, गुरु नानक जयंती, कार्तिका पौर्णिमा, कनकदास जयंती या प्रसंगी बँकांनी सुट्टी असणार आहे. विविध सण आणि राष्ट्रीय कार्यक्रम निमित्त नोव्हेंबरमध्ये अनेक राज्यांमध्ये १५ दिवस बँका बंद राहतील. पुढीलप्रमाणे बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक असणार आहे. त्यामुळे बँकेत जायचा विचार करत असाल तर आधी हे वेळापत्रक पाहून खात्री करुन घ्या.

  • ११ नोव्हेंबर (शनिवार) – दुसऱ्या शनिवारी बँकांची नियमित सुट्टी
  • १२ नोव्हेंबर (रविवार) – रविवारमुळे बँका बंद
  • १३ नोव्हेंबर (सोमवार) – गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा, (दीपावली)/दिवाळी यानिमित्त त्रिपुरा, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात बँका बंद राहतील.
  • १४ नोव्हेंबर (मंगळवार) – दिवाळी (बलिप्रतिपदा) – गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, सिक्कीम या राज्यांत बँका बंद राहतील.
  • १५ नोव्हेंबर (बुधवार) – भाऊबीज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / सेंग कुत्स्नेम यानिमित्त सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद आहेत.
  • १९ नोव्हेंबर (रविवार) – बँकांची नियमित सुट्टी
  • २० नोव्हेंबर : छठ पूजा असल्याने बिहारसह राजस्थानमध्ये बँकांना सुट्टी असेल.
  • २३ नोव्हेंबर : सेंग कुत्स्नेम आणि इगास बागवाल यांचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये सुट्टी असेल.
  • २५ नोव्हेंबर : या दिवशी चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
  • २६ नोव्हेंबर : रविवारची सुट्टी
  • २७ नोव्हेंबर : गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे. त्रिपुरा, मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, नवी दिल्ली, बिहार, झारखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये या दिवशी सुट्टी असेल.
  • ३० नोव्हेंबर : कनकदास जयंती. कर्नाटकात या दिवशी बँका बंद राहणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -