Monday, June 30, 2025

Ayodhya Ram mandir : अयोध्येत राम मंदिर उद्घाटनासाठी आमदार नितेश राणे यांच्याकडून दोन रेल्वेंची व्यवस्था...

Ayodhya Ram mandir : अयोध्येत राम मंदिर उद्घाटनासाठी आमदार नितेश राणे यांच्याकडून दोन रेल्वेंची व्यवस्था...

कणकवली : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील राम मंदिराचे (Ayodhya Ram mandir) काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. जानेवारी महिन्यात २२ तारखेला या मंदिराचे भव्य उद्घाटन (Ram Mandir Inauguration) पार पडणार आहे. या उद्घाटनाचे प्रसारण देश-विदेशात लाईव्ह (Live) केले जाणार आहे. देशातील सगळ्या राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे. देशातील प्रसिद्ध क्रीडापटू, साहित्यिक, वरिष्ठ पत्रकारांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. शिवाय देशातील अनेक रामभक्त आणि हिंदू नागरिक या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.


महाराष्ट्रातून देखील मोठ्या संख्येने हिंदूंनी राम मंदिराच्या उद्घाटनाकरता जमावे आणि 'याचि देही याचि डोळा' सोहळा पाहावा यासाठी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांनी दोन रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी विधानसभा क्षेत्रातील सर्व रामभक्तांना अयोध्येला जाण्यासाठी या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या सोशल मीडियावरुन नितेश राणे यांनी यासंबंधी पोस्ट करत घोषणा केली आहे.


या दोन्ही गाड्या कणकवली रेल्वे स्थानकातून सुटणार आहेत. तारीख आणि वेळ लवकरच कळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोकणवासियांना अयोध्येच्या राम मंदिराचे उद्घाटनादिवशी प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >