नवी दिल्ली: सणासुदीची सुरूवात होताच पीएफ खातेधारकांना(pf account holder) मोठे गिफ्ट मिळाले आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. रिपोर्टनुसार कर्मचारी भविष्य निधी संघटनेने भविष्य निधी(पीएफ) खात्यात व्याज जमा करण्यास सुरूवात केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३साठी पीएफ खात्यात गुंतवणुकीवर व्याजदर ८.१५ टक्के आहे. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे आधीच मिळाले आहेत. दरम्यान, खात्यात आता व्याजदराची रक्कम दिसण्यास थोडा वेळ लागू शकतो.
पाईपलाईनमध्ये आहे प्रक्रिया
ईपीएफओनुसार व्याज जमा करण्याची प्रक्रिया पाईपलाईनमध्ये आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. जेव्हा हे व्याज जमा केले जाईल. ईपीएफओने कर्मचाऱ्यांना थोडा धीर धरण्याची विनंती केली आहे .
२४ कोटी खात्यांमध्ये व्याज जमा
केंद्रीय श्रम मंत्री भूपेंद्र यादव यांच्या माहितीनुसार, साधारण २४ कोटीहून अधिक खात्यांमध्ये आधीच व्याज जमा केले आहे. एकदा हे व्याज जमा झाले की त्या व्यक्तीला खात्यात ती रक्कम दिसेल. कोणतीही व्यक्ती भविष्य निधी खात्याचा बॅलन्स अनेक पद्धतीने चेक करू शकत. टेक्स्ट मेसेज, मिस्ड कॉल, उमंग अॅप आणि ईपीएफओच्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता.
असा ठरवला जातो व्याजदर
यावर्षी ईपीएफओकडून जुलैमध्ये व्याजदराची घोषणा केली गेली होती. पीएफचे व्याजदर दरवर्षी अर्थ मंत्रालयाच्या सल्ल्याने ईपीएफओके सीबीटीद्वारे ठरवली जाते.