ब्राझिल : प्रसिद्ध ब्राझिलियन मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर लुआना आंद्राडे (Luana Andrade) हिचे वयाच्या अवघ्या २९व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिला कॉस्मेटिक सर्जरी (Cosmetic surgery) करून घेणे महागात पडल्याचे आता समोर आले आहे. लुआना हिच्या निधनाची माहिती समोर येताच चाहत्यांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला. लुआना हिच्या निधनावर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले. सध्या सर्वत्र लुआना आंद्राडे हिच्या निधनाची चर्चा सुरु आहे.
ब्राझिलियन टीव्ही शो ‘पॉवर कपल ६’ मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री लुआना आंद्राडे ही साओ पाउलो येथील रहिवासी आहे. या अभिनेत्रीला कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करताना एक दोन नाही तर तब्बल ४ वेळा कार्डिएक अरेस्टचे झटके आले. त्यामध्ये तिचे निधन झाले.