Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023Sri Lanka Cricket : आयसीसीने वर्ल्डकपदरम्यान श्रीलंका बोर्डाला केले निलंबित, सांगितले कारण

Sri Lanka Cricket : आयसीसीने वर्ल्डकपदरम्यान श्रीलंका बोर्डाला केले निलंबित, सांगितले कारण

मुंबई: क्रिकेटची मोठी संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल(icc) म्हणजेच आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला(srilanka cricket board) तत्कालीन प्रभावाने निलंबित केले आहे. हा निर्णय खूपच महत्त्वाचा आहे, कारण आता विश्वचषकातील सामने सुरू आहेत. या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाची कामगिरी चांगली जाली नाही.

खराब कामगिरीनंतर श्रीलंकेच्या सरकारने संपूर्ण मंडळ बरखास्त केले होते. यानंतर राष्ट्रपतींनी तपासासाठी आपल्याकडून खास कमिटी बनवली होती. आयसीसीने याला सरकारकडून मंडळाच्या कामकाजात दखल केल्याचे म्हटले आहे. या कारणामुळेच त्यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. श्रीलंकेच्या संघाला विश्वचषकात अफगाणिस्तानकडूनही पराभव सहन करावा लागला होता.

क्रिकइन्फोच्या माहितीनुसार आयसीसीने सांगितले आज आमच्या बोर्डाने बैठकीनंतर निर्णय घेतला की श्रीलंका क्रिकेट एक सदस्याच्या रूपात आपल्या दायित्वाचे गंभीररित्या उल्लंघन करत आहे. श्रीलंकेच्या बोर्डाला ही ग्वाही द्यावी लागेल की त्यांच्या कामाकाजात सरकारकडून कोणताही हस्तक्षेप असता कामा नये. दरम्यान, निलंबनासाठी कोणत्या अटी घालण्यात आल्या आहेत यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -