मुंबई: सध्याच्या मॉडर्न आणि धावपळीच्या आयुष्यात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणामुळे माणूस अनेक आजारांची शिकार होत आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक नानाविध प्रयोग करत असतात. काहीजण एक्सरसाईज, योगा, जिम, डान्स क्लास, झुम्बा क्लास लावत असतात.
काहीजण तर घरात बसून अतिशय नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. यातीलच एक पद्धत म्हणजे कोमट पाण्यात लिंबूचा रस मिसळून पिणे. यामुळे वजन लवकर कमी होते असे म्हणतात.
मात्र अनेक लोकांची तक्रार असते की ते दररोज रिकाम्या पोटी लिंबू-कोमट पाण्याचे सेवन करतात मात्र त्यानंतरही त्यांचे वजन नियंत्रणात राहत नाही आहे. असे यासाठी कारण तुम्ही योग्य पद्धतीने लिंबू-पाणी पित नाही आहात. यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होत नाही आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते.
लिंबूपाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत
लिंबामधील व्हिटामिन सीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. वजन नियंत्रणात आणण्यासाठी हे यासाठी प्यायले जाते ज्यामुळे शरीरातील घाण बाहेर टाकली जावी. आरोग्य तज्ञांच्या मते दररोज रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्यास वजन नियंत्रणात राहते. हे आपले शरीर, त्वचा आणि केसांच्या विकासासाठी फायदेशीर आहे. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर निघण्यास मदत होते.
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया मजबूत होण्यास मदत होते. शरीरातील फॅट बर्निंग प्रोसेस चांगली होते. जर तुम्ही दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबू टाकून प्यायल्यास शरीर पूर्णपणे डिटॉक्स होण्यास मदत होते.