Wednesday, July 17, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023SA vs AFG : दक्षिण आफ्रिकेकडून अफगाणिस्तानचा ५ विकेट राखत पराभव

SA vs AFG : दक्षिण आफ्रिकेकडून अफगाणिस्तानचा ५ विकेट राखत पराभव

अहमदाबाद: रासी वेन डर डुसैन आणि एंडिले फेहलुकवायोने सावध खेळी करत दक्षिण आफ्रिकेला विश्वचषक २०२३च्या ९व्या लीग सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध ५ विकेटनी विजय मिळवून दिला. आव्हानाचा पाठललाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी रासी तिसऱ्या स्थानावर बॅटिंगसाठी उतरला होता. त्याने ९५ बॉलमध्ये ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७६ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानसाठी रशीद आणि नबीने २-२ विकेट मिळवले.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात अफगाणिस्तान टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरत ५० षटकांत २४४ धावांवर ऑलआऊट झाली होती. संघासाठी पाचव्या स्थानावर उतरलेल्या अजमतुल्लाह उरजईने ९७ धावांची शानदार खेळी केली होती. मात्र ती संघाच्या विजयास पुरेशी ठरू शकली नाही. या दरम्यान दक्षिण आफ्रिकेसाठी गेराल्ड कोएटजीने ४ विकेट मिळवल्या होत्या.

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी चांगली सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. याचवेळी मुजीब उऱ रहमानने कर्णधार बावुमाला २३ धावांवर बाद करत ही भागीदारी तोडली. यानंतर१४व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर क्विंटन डी कॉकही बाद झाला. कॉकने ४७ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या.

तिसऱ्या विकेटसाठी रासी वेन डुर डुसैन आणि मार्करम यांनी ५० धावांची भागीदारी केली. २४व्या ओव्हरमध्ये मार्करमच्या विकेटनी ही भागीदारी तुटली. त्यानंतर २८व्या ओव्हरमध्ये पाचव्या स्थानावर बॅटिंगसाठी उतरलेल्या हेनरिक क्लासेनलाही राशिद खानने बाद केले. या पद्धतीने आफ्रिकाने १३९ धावांवर ४ विकेट गमावल्या आणि एकावेळेस असे वाटले की हा सामना अफगाणिस्तानच्या बाजूने जाईल.

मात्र रासी वॅन डेर डुसैनने क्रीजवर टिकून राहत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. क्लासेनने बाद झाल्यानंतर रासीने डेविड मिलरसोबत पाचव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -