Wednesday, November 13, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023World Cup 2023: न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये खेळण्यासाठी सज्ज, श्रीलंकेचा केला ५ विकेटनी पराभव

World Cup 2023: न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये खेळण्यासाठी सज्ज, श्रीलंकेचा केला ५ विकेटनी पराभव

बंगळुरू: न्यूझीलंडने(new zealand) श्रीलंकेला(srilanka) ५ विकेटनी हरवले. या विजयानंतर न्यूझीलंडच्या संघाने सेमीफायनलमध्ये आपली मजबूत दावेदारी सादर केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांना जोरदार झटका बसला आहे. या विजयानंतर न्यूझीलंडचे ९ सामन्यानंतर १० पॉईंट्स झाले आहे. न्यूझीलंडचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडचा सलामीवीर ड्वेन कॉनवे आणि रचिन रवींद्रची धमाकेदार सुरूवात

न्यूझीलंडसमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान होते. न्यूझीलंडने हे आव्हान २३.२ षटकांत ५ विकेट गमावत पूर्ण केले. श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला न्यूझीलंड संघाची सुरूवात दमदार झाली. न्यूझीलंडचा सलामीवीर ड्वेन कॉनवे आणि रचिन रवींद्रने पहिल्या विकेटसाठी १२.२ षटकांत ८६ धावांची भागीदारी केली. ड्वेन कॉनवेने ४२ बॉलमध्ये ४५ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार लगावले. ड्वेन कॉनवेला दुष्मांचा चमिराने बाद केले.

ड्वेन कॉनवेनंतर रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन्स परतले पॅव्हेलियनमध्ये

न्यूझीलंडला रचिन रवींद्रच्या रूपात दुसरा झटका बसला. रचिन रवींद्रने ३४ बॉलमध्ये ४२ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार लगावले. रचिन रवींद्रने महीश तीक्ष्णाला बाद केले. यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन्स पॅव्हेलियनमध्ये परतला. केन विल्यमसन्सने १५ बॉलमध्ये १४ धावा केल्या. केन विल्यमसन्सला अँजेलो मॅथ्यूजला आपली शिकार बनवली.

टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरला श्रीलंकेचा संघ

याआधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन्सने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाला ४६.४ ओव्हरमध्ये १७१ धावा करता आल्या. श्रीलंकेसाठी कुसल परेराने ५० धावांची खेळी केली. कुसल परेराने २८ चेंडूत ५१ धावांची खेळी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -