
मुंबई: घड्याळ(watch) हे नेहमी डाव्या हातातच बांधले जाते. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे. लोक अनेक वर्षांपासून असेच घालत आहेत की त्यामागेही काही कारण आहे? सोशल मीडियावर हा प्रश्न विचारण्यात आला. यावर अनेक युजर्सनी वेगवेगळी उत्तरे दिली. मात्र तुम्हाला यामागचे शास्त्रीय कारण माहीत आहे का?
पहिली गोष्ट म्हणजे अधिकतर लोक आपल्या उजव्या हाताने काम करतात. त्यामुळे हा हात सतत व्यस्त असतो. अशातच डाव्या हातात घड्याळ बांधल्याने सतत वेळ बघण्यास त्रास होत नाही. डाव्या हातावर घड्याळ बांधल्याने ते सुरक्षित राहते. तसेच पडण्याचाही धोका नसतो. हेच कारण लक्षात घेता अनेक कंपन्या डाव्या हातावर बांधण्यासाठी घड्याळ बनवतात.
जाणून घ्या शास्त्रीय कारण
लक्ष देऊन पाहिल्यास टेबलावरील घड्याळ नेहमी सरळ असते. स्टँडवर ठेवातचा घड्याळातील १२ हा आकडा नेहमी वर असतो. भिंतीवरही आपण असेच घड्याळ अडकवतो. जर आपण घड्याळ डाव्या हाताऐवजी उजव्या हातावर बांधले तर हा १२ अंक खाली जाईल आणि क्रम उलटा होईल.
अशातच तुम्हाला घड्याळाचे वाचन कऱणे कठीण होईल. जेव्हा ऑटोमॅटिक घड्याळाचा जमाना होता तेव्हा हे घड्याळ लोक दोन्ही हातांवर बांधत होते. उजव्या हातावर बांधताना चावी बाहेरच्या दिशेला जात होती यामुळे चावी देण्यास त्रास होत असे. दरम्यान, डाव्या हातावर बांधल्यास चावी आतल्या बाजूस यायची. आता तुम्हाला याचे खरे कारण समजले असेल.