हैदराबाद : तेलंगणात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मंत्री टपावर चढून जोरदार प्रचार सुरु असताना अचानक ड्रायव्हरने ब्रेक दाबल्यामुळे लोकांच्या वजनामुळं रेलिंग तुटले आणि टपावर उभे असलेले मंत्री खाली कोसळले.
निझामाबाद जिल्ह्यातील अरमूर इथं निवडणूक प्रचारादरम्यान ही दुर्घटना घडली. अचानक ही घटना घडल्यानं बीआरएसचे मंत्री महोदय थेट बसच्या टपावरुन खाली जमिनीवर पडल्याने त्यांना मार लागला आहे.
View this post on Instagram
यावेळी तेलंगणाचा आरमूर मतदारसंघात मंत्री केटीआर, जीवन रेड्डी आणि खासदार सुरेश रेड्डी प्रचाराच्या वाहनातून खाली पडले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झालेली नसली तरी याचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आला आहे.