Thursday, July 10, 2025

Quatar: कतारमध्ये ८ भारतीयांच्या मृत्यूच्या शिक्षेविरोधात भारताने दाखल केले अपील

Quatar: कतारमध्ये ८ भारतीयांच्या मृत्यूच्या शिक्षेविरोधात भारताने दाखल केले अपील

नवी दिल्ली: कतारमध्ये भारताच्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावल्याप्रकरणात भारत सरकार वेगवान कारवाई करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी दिलेल्या माहितीनुसार या संवेदनशील प्रकरणात भारताकडून अपील करण्यात आली आहे. तसेच भारतीय अधिकारी सातत्याने कतारमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.


परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जजमेंट गोपनीय आहे. अधिकृत टीमसोबतच याची चर्चा करण्यात आल आहे.सोबतच भारताने याप्रकरणी अपीलही केले. आम्ही कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत तसेच त्यांच्या कुटुंबियांच्याही संपर्कात आहेत. परराष्ट्र मंत्र्यांनीहीह त्यांची भेट घेतली होती. ७ नोव्हेंबरला काऊंसलर अॅक्सिस मिळाला आणि आम्ही त्या ८ भारतीयांशी भेटलो. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे.


कतारच्या न्यायालयाने ज्या ८ भारतीयांना शिक्षा सुनावली आहे ते सर्व भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आहेत. नौदलाचे हे ८ जवान गेल्या वर्षी ऑगस्ट २०२२ पासून कतारच्या जेलमध्ये बंद आहेत. दरम्यान, त्यांच्यावर लावलेल्या आरोपांबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही.


त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप सार्वजनिक कऱण्यात आलेले नाहीत. हे आधही अधिकारी खासगी कंपनी दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीस अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी काम करत होते. कतारमध्ये भारताच्या राजदूतांनी यावर्षी एक ऑक्टोबरला जेलमध्ये यांची भेट घेतली होती.



कोण आहेत हे ८ भारतीय?


कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन सौरभ वाशिष्ठ, कमांडर पुरेनेंदु तिवारी, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश कतार जेलमध्ये कैद आहेत. यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Comments
Add Comment