मुंबई: अनेकजण आपल्या ब्रेकफास्टमध्ये अंडी खाणे पसंत करतात. अंडे चवदार असण्यासोबतच हेल्दीही आहे. यात व्हिटामिन्स, आर्यन आणि प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. मात्र आजही लोकांना असा प्रश्न पडतो की उकडलेले अंडे चांगले की अंड्याचे ऑम्लेट. काहींच्या मते उकडलेले अंडे आरोग्यासाठी फायदेशीर असते तर काहींच्या मते अंड्याचे ऑम्लेट चांगले असते. जाणून घेऊया…
उकडलेले अंडे हा नाश्त्याचा एक सोपा प्रकार आहे. यात खास तयारीची गरज नसते. उकडलेले अंडेही पौष्टिक असते. यात खालीलप्रकारे पोषक तत्वे असतात.
प्रोटीन – अंडी हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो. एका उकडलेल्या अंड्यामध्ये ६ ग्रॅम प्रोटीन असते.
व्हिटामिन डी – अंड्यामध्येही व्हिटामिन डी आढळते. एका उकडलेल्या अंड्यात ६ टक्के व्हिटामिन डी असते.
कोलीन – अंडे कोलीनचा चांगला स्त्रोत आहे जे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय फायदेशीर आहे.
ल्यूटिन आणि जेक्सँथिन – हे दोन अँटीऑक्सिडंट अंडयामध्ये आढळतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे.
नाश्त्यामध्ये अनेकांना ऑम्लेट खाणे पसंत आहे. ऑम्लेट हे चवीला अतिशय सुंदर लागते तसेच हेल्दीही असते. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे ऑम्लेट बनवू शकता. यात तुम्ही भरपूर भाज्या, चिकन, तसेच दुसऱ्या गोष्टी टाकून बनवू शकता.
फायबर – भाज्यांनी भरपूर असलेले ऑम्लेट हा फायबरचा मोठा स्त्रोत आहे. यामुळे पाचनसंस्था सुरक्षित राहते. तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी राहण्यासही मदत होते.
आर्यन – हे अतिशय आवश्यक खनिज आहे जे लाल रक्तपेशी बनवण्यासोबतच संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम करते. पालकने भरलेले ऑम्लेट आर्यनचा चांगला स्त्रोत आहे.
व्हिटामिन सी – भाज्यांनी भरलेले ऑम्लेट हा व्हिटामिन सीचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. व्हिटामिन सी अँटी ऑक्सिडंट म्हणूनही काम करते.
हेल्दी फॅट – अंड्यामध्ये हेल्दी फॅट असते. यात मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटचा समावेश आहे. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
उकडलेले अंडे अथवा ऑम्लेट दोन्हीही शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानली जातात. उकडलेल्या अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटामिन डी आणि कोलीन मोठ्या प्रमाणात असते तर ऑम्लेटमध्ये फायबर, आर्यन, व्हिटामिन सी आणि हेल्दी फॅट मोठ्या प्रमाणत असातात. जर तुम्हाला डाएटमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे असेल तर ब्रेकफास्टसाठी उकडलेले अंडे उत्तम पर्याय आहे. तुम्हाला विविध प्रकारची पोषकतत्वे हवी असतील तर ऑम्लेट खाऊ शकता.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…