Monday, December 2, 2024
Homeताज्या घडामोडीGautam Adani : चीनला दणका देण्यासाठी अमेरिकेचा अदानींना पाठिंबा; श्रीलंकेत बंदर बांधण्यासाठी...

Gautam Adani : चीनला दणका देण्यासाठी अमेरिकेचा अदानींना पाठिंबा; श्रीलंकेत बंदर बांधण्यासाठी देणार ५५ कोटी डॉलर!

Gautam Adani श्रीलंकेतील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेने अदानी समूहा सोबत करार करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे बंदर टर्मिनल बांधण्यासाठी गौतम अदानी (Gautam Adani) यांना ५५३ दशलक्ष डॉलर्सची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलंबोच्या वेस्ट कंटेनर टर्मिनलचा विकास करण्यासाठी गौतम अदानींना इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून ही रक्कम मिळणार आहे. अमेरिकन सरकारी संस्था इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनची आशियातील ही सर्वात मोठी पायाभूत गुंतवणूक म्हणता येईल.

अमेरिकेच्या डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे म्हणणे आहे की, यामुळे श्रीलंकेतील आर्थिक व्यवहारांना चालना मिळण्यास मदत होईल. असे असले तरी दक्षिण आशियातील चीनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी हा एक प्रकारे अप्रत्यक्ष करार केला असल्याची चर्चा आहे. यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात अधिक चांगला समन्वय साधणे शक्य होणार आहे.

अमेरिकन गुंतवणूक कंपनीने २०२३ मध्ये आतापर्यंत ९.३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. चीनने गेल्या वर्षी श्रीलंकेत २.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. श्रीलंकेतील ही सर्वात मोठी थेट विदेशी गुंतवणूक आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, चीन श्रीलंकेला कर्जाच्या जाळ्यात अडकवत आहे आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर खूप विपरीत परिणाम होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -