मुंबई: प्रत्येक मनुष्य स्वभावाने वेगवेगळा असतो. अनेकदा काही गोष्टींवरून माणसाच्या पर्सनालिटीबद्दल जाणून घेते. तुमच्या झोपण्याच्या सवयीवरूनही तुम्ही कसे आहात हे समजते. अनेकांना वेगवेगळ्या स्थितीत झोपण्याची सवय आहे. काही जण पाठीवर झोपतात. तर काहींना पोटावर झोपण्याची सवय असते. अनेकांना कुशीवर झोपण्याची सवय असते.
पाठीवर झोपणारे लोक
जर एखादी व्यक्ती पाठीवर झोपत असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती जीवनात फोकस्ड आहे. केवळ इतकंच नव्हे तर शांत आणि मजबूतही आहे. अशी व्यक्ती वादांपासून दूर राहते आणि नेहमी खरे बोलते. असे लोक खूप आशावादी असतात आणि जीवन खुलेपणाने जगतात. त्यांना नेहमी केंद्रस्थानी राहायला आवडते.
पोटावर झोपणारे लोक
अनेकांना पोटावर झोपण्याची सवय असते. याचा अर्थ त्यांची इच्छाशक्ती प्रचंड मजबूत असते. या व्यक्ती आपल्या बोलण्यात अतिशय स्पष्ट असतात. मात्र यांचे बोलणे कटूही असू शकते. हे लोक आतल्या आत चिंता आणि समस्येचा सामना करतात. पोटावर झोपणारे लोक रागीटही असू शकतात.
कुशीवर झोपणारे लोक
एखादी व्यक्ती जर कुशीवर झोपत असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती खूपच सोपी आणि सामाजिक व्यक्ती आहे. अशा व्यक्ती कोणाशी बोलण्यात कचरत नाही. या लोकांना विश्वासू म्हटले जाते. भलेही या व्यक्तींना पाहिल्यावर असे वाटेल की यांना कोणीही फसवू शकतं मात्र तसे नसते. त्यांना परिस्थितीची जाण असते. हे लोक निर्णय घेण्याच्या बाबतीत सुस्त असतात. तसेच अतिशय दयाळूही असतात.