Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीFake photo: रश्मिका-कतरिनानंतर आता सारा तेंडुलकरच्या फोटोसोबत छेडछाड

Fake photo: रश्मिका-कतरिनानंतर आता सारा तेंडुलकरच्या फोटोसोबत छेडछाड

मुंबई: बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींचे अनेकदा फोटोशॉप, मॉर्फ्ड आणि डीपफेक सारखे फोटोज तसेच व्हिडिओज व्हायरल होत असतात. नुकताच रश्मिका मंदानाचा एक फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या जाळ्यात टायगर ३ अभिनेत्री कतरिना कैफही अडकली. आता या लिस्टमध्ये आणखी नाव जोडले गेले आहे.

हे नाव दुसरे तिसरे कोणाचे नसून महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिचे आहे. साराचा एक फेक फोटोशॉप केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलचा फेक फोटो

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत सारा तेंडुलकर रुमर्ड बॉयफ्रेंड आणि भारताचा क्रिकेटर शुभमन गिलच्या गळ्यात हात घातलेली दिसत आहे. हा फोटो धोनी पोपा नावाच्या एका युझरने शेअर केले आहे. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिले की साराने कन्फर्म केले की ती शुभमन गिलला डेट करत आहे. मात्र त्याचवेळी एका कर्मचाऱ्याने कमेंट करत फोटोचा खरेपणा सिद्ध केला. युझरने साराचा खरा फोटो शेअर करत सांगितले की हा फोटो खोटा आहे. सारा शुभमन गिलसोबत नव्हे तर आपला भाऊ अर्जुन तेंडुलकरसोबत दिसत आहे.

भाऊ अर्जुन तेंडुलकरसोहत साराने शेअर केला होता फोटो

साराने अर्जुनसोबतचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भावाच्या २४व्या बर्थडेनिमित्त शेअर केला होता. खऱ्या फोटोत अर्जुन खुर्चीवर बसला आहे. तर सारा त्याला मिठी मारताना दिसत आहे. यावेळेस भाऊ-बहीण हसताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत साराने आपल्या भावाला बर्थडे विश केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -