Thursday, September 18, 2025

महिलांच्या शरीरात असे काय वेगळे असते की ज्यामुळे त्यांना दाढी आणि मिशी येत नाही? घ्या जाणून

महिलांच्या शरीरात असे काय वेगळे असते की ज्यामुळे त्यांना दाढी आणि मिशी येत नाही? घ्या जाणून

मुंबई: मनुष्य जीव हा इतर प्राण्यांच्या तुलनेत विशेष आहे. त्यांच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे,समजण्याची ताकद आहे. तसेच कोणत्याही विषयावर आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. हे गुण प्रत्येक मनुष्यामध्ये असतात. मात्र देवाने महिला आणि पुरुषांच्या शरीरात असे काही बदल केले आहेत जे दोघांमध्ये वेगवेगळे आहेत. तुमच्या डोक्यात आता असा सवाल आला असेल की जसे पुरुषांच्या चेहऱ्यावर दाढी असते तसे महिलांना का नसते. महिलाही एक माणूस आहे मग त्यांना मिशी का येत नाही जाणून घेऊया...

काय आहे कारण?

पुरुषांमध्ये डाय हायड्रोटेस्टोस्टीरॉन नावाचे एन्झाईम असते ज्यामुळे त्यांचे हेअर फॉलिकल उत्तेजित होतात आणि त्यांना दाढी येते. महिलांमध्ये हे एन्झाईम आढळत नाही. महिलांच्या यौन ग्रंथी एस्ट्रोजन नावाचे हार्मोन निर्माण करतात. एस्ट्रोजनमुळे मुलींच्या शरीरात बदल होतात. त्यानंतर ती मुलगी किशोरावस्थेमध्ये प्रवेश करते. महिलांमध्ये सेक्स हार्मोन पुरुष हार्मोनच्या उलट काम करतात. महिलांच्या शरीरात मेल हार्मोन वाढल्यास अथवा फीमेल हार्मोन कमी झाल्यास दोन्ही हार्मोनमधील बॅलन्स बिघडतो. या कारणामुळे नको त्या जागेवर केस उगवतात.

पुरुषांमध्येही दिसतात बदल

PCOS (पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम), PCOD (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज) आणि हार्मोनल असंतुलन अशी काही कारणे आहेत ज्यामुळे महिलांना केस येत नाही. तसेच एंड्रोजन नावाचे हार्मोन पुरुषांमध्ये दाढी-मिशी येण्याचे कारण बनतात. यामुळे शरीरात काही बदल होतात.

Comments
Add Comment