वडोदरा: गुजरातच्या वडोदरामध्ये एका मुलीने आपल्या आई-वडिलांच्या विरोधात जात प्रेमविवाह केला. यामुळे चिडलेल्या वडिलांनी समाजाला गोळा करून शोकसभा घातली. इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या केसाचे मुंडनही केले. ही घटना लिलोरा गावात घडली. या संपूर्ण गावात याच गोष्टीची चर्चा आहे. मुलीने दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल्याने मुलीचे आई-वडिल तिच्यावर चिडले आहेत. या मुलीचे बऱ्याच काळापासून एका युवकासोबत प्रेमसंबंध होते.
वाघोडिया तहसीलमधील एका छोट्याशा लिलोरा गावातील निवासी हसमुखभाई वादलंच यांची मोठी मुलगी अर्पिता बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. १२ ऑक्टोबरला अर्पिताने आपल्या आई-वडिलांच्या विरोधात जात ऋत्विक भालिया नावाच्या तरूणाशी लग्न केले. त्यानंतर अर्पिताने ही माहिती २२ ऑक्टोबरला आपल्या वडिलांना मेसेजद्वारे दिली.
वडिलांनी उचलले हे पाऊल
मुलीने आपल्या मर्जीविरोधा लग्न केल्याने आई-वडिलांना मोठा धक्काच बसला. वडिलांनी तर भयानक पाऊल उचलले. त्यांनी आपल्या मुलीला मृत घोषित करत तिच्या नावाने शोकसभा बोलावली. त्यांनी आपल्या मुलीच्या नावासमोर स्वर्गीय असे लिहित बॅनर छापले तसेच आपल्या केसांचे मुंडनही केले. समाजाला हे ही सांगितले की आता त्यांचा आपल्या मुलीशी कोणताही संबंध नाही. त्यांची मुलगी त्यांच्यासाठी कायमची मेली आहे.
गुजरात सरकारने कायदा बनवला आहे की आई-वडिलांच्या मर्जीविरोधात कोणीही प्रेमविवाह करू शकत नाही. मात्र आतापर्यंत हा कायदा लागू करण्यात आलेला नाही. हसमुखभाई वालंद मागणी करत आहेत की हा कायदा लवकरात लवकर लागू केला जावा यामुळे कोणतीही मुलही असे पाऊल उचलणार नाही.