Live sex show रॅकेटचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश, ३ अभिनेत्रींसह ५ जण अटकेत

मुंबई : पिहू नावाच्या मोबाईल अ‍ॅपवरून पैसे आकारून 'लाइव्ह सेक्स शो'चे (Live sex show) प्रसारण मुंबईत सुरु होते. या घटनेची कुणकुण लागताच अंधेरी येथील वर्सोवा पोलिसांनी सापळा रचून ३ अभिनेत्रींसह ५ जणांना अटक केली आहे. या घटनेतील इतर गुन्हेगारांचा शोध सुरु आहे.


या घटनेअंतर्गत पोलिसांनी ३ अभिनेत्रींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना महिलांसोबत ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल बुक करण्याची सुविधा या अ‍ॅपच्या माध्यमातून देण्यात आली होती. तिघे पॉर्न व्हिडिओ बनवून मोबाइल अ‍ॅपवर अपलोड करायचे. एका स्थानिकाच्या मदतीने ही माहिती पोलिसांपर्यत पोहचली.


पोलिसांनी सापळा रचून रविवारी एका बंगल्यात छापा टाकला. अंधेरी पश्चिम येथे शुटींग चालू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सर्तक राहून हा सापळा रचला. अंधेरी पश्चिमेकडील चार बंगला भागातील एका बंगल्यात पोलिसांनी दिवसा छापा टाकला. त्यावेळी उपस्थित तिघींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तिघीजणी पॉर्न फिल्ममध्ये काम करत होत्या. तर अन्य दोन जण पिहू अ‍ॅपमध्ये अश्लील व्हिडिओ अपलोड करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या घटनेअंतर्गत सहभागी असलेल्या गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे

नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा मुंबई : - नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे,

मराठा समाजासाठी महत्त्वाची बातमी, शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्यांची प्रशासकीय छाननी करणाऱ्या शिंदे समितीला सहा

फूड डिलिव्हरी बॉय संपावर, थर्टी फर्स्टच्या घरगुती पार्ट्या संकटात ?

मुंबई : नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो आदी अॅपबेस्ड फूड ऑर्डर पूर्ण करणाऱ्या

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या