Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीLive sex show रॅकेटचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश, ३ अभिनेत्रींसह ५ जण...

Live sex show रॅकेटचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश, ३ अभिनेत्रींसह ५ जण अटकेत

मुंबई : पिहू नावाच्या मोबाईल अ‍ॅपवरून पैसे आकारून ‘लाइव्ह सेक्स शो’चे (Live sex show) प्रसारण मुंबईत सुरु होते. या घटनेची कुणकुण लागताच अंधेरी येथील वर्सोवा पोलिसांनी सापळा रचून ३ अभिनेत्रींसह ५ जणांना अटक केली आहे. या घटनेतील इतर गुन्हेगारांचा शोध सुरु आहे.

या घटनेअंतर्गत पोलिसांनी ३ अभिनेत्रींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना महिलांसोबत ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल बुक करण्याची सुविधा या अ‍ॅपच्या माध्यमातून देण्यात आली होती. तिघे पॉर्न व्हिडिओ बनवून मोबाइल अ‍ॅपवर अपलोड करायचे. एका स्थानिकाच्या मदतीने ही माहिती पोलिसांपर्यत पोहचली.

पोलिसांनी सापळा रचून रविवारी एका बंगल्यात छापा टाकला. अंधेरी पश्चिम येथे शुटींग चालू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सर्तक राहून हा सापळा रचला. अंधेरी पश्चिमेकडील चार बंगला भागातील एका बंगल्यात पोलिसांनी दिवसा छापा टाकला. त्यावेळी उपस्थित तिघींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तिघीजणी पॉर्न फिल्ममध्ये काम करत होत्या. तर अन्य दोन जण पिहू अ‍ॅपमध्ये अश्लील व्हिडिओ अपलोड करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या घटनेअंतर्गत सहभागी असलेल्या गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -