मुंबई: आजकाल लोक ऑफिसमधील कामासाठी डेस्कटॉपच्या जागी लॅपटॉपचा(laptop) वापर करत आहेत. अशातच ते बराच काळ लॅपटॉपवर घालवत असतात. यामुळे लॅपटॉपची बॅटरीही दीर्घकाळ टिकणे गरजेचे असते.
जर तुम्हीही बराच वेळा लॅपटॉपवर घालवत असाल आणि लॅपटॉपची बॅटरी लवकर संपत असेल तर आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला अशा टिप्स देत आहोत ज्यामुळे तुमचा हे टेन्शन कमी होईल. या टिप्स फॉलो केल्यावर तुमच्या लॅपटॉपची बॅटरी दीर्घकाळ राहील.
दरम्यान, यासाठी तुम्हाला तुमच्या लॅपटॉपच्या सेटिंग्समध्ये थोडा बदल करावा लागेल. सशिवाय तुम्ही तुमच्या लॅपटॉप वापरण्याच्या सवयी बदलूनही त्याची बॅटरी लाईफ सुधरू शकता. जाणून घेऊया लॅपटॉपची बॅटरी दीर्घकाळ टिकण्यासाठी काय करावे लागेल.
जर तुम्हाला वाटत असेल की लॅपटॉपची बॅटरी दीर्घकाळ टिकावी तर त्या लॅपटॉपची बॅटरी कंझ्यूम होण्यापासून वाचवा. बॅटरी वाचवण्यासाठी लॅपटॉपमध्ये पॉवर सेटिंग्सचा पर्याय असतो. येथून तुम्हाला समजेल की लॅपटॉपची बॅटरी कशापद्धतीने काम करत आहे. सोबतच हे ही जाणून घेऊ शकता की बॅटरी सेटिंग्सचे कोणकोणते पर्याय वापरून तुम्ही लॅपटॉपची बॅटरी लाईफ सुधारू शकता.
याशिवाय तुम्ही बॅटरी वाचवण्यासाठी हायबरनेट्स मोडचाही वापर करू शकता. जर तुम्हाला हायबरनेट्स मोडबद्ल माहीत नसेल तर जेव्हा तुमच्या लॅपटॉपची बॅटरी पूर्णपणे संपायला आली असेल तर बॅटरी पूर्ण संपण्याआधी लॅपटॉपचे हायबरनेट मोड स्विच करायचा असतो.
इतकंच नव्हे जर तुम्हाला लॅपटॉपची बॅटरी वाचवायची असेल तर लॅपटॉपच्या बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेले सर्व अॅप्स बंद करावेत. हे अॅप्स लॅपटॉपची बॅटरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात. हे अॅप्स बंद केल्ययाने बॅटरीचा वापर कमी होईल आणि लॅपटॉप लवकर डिस्चार्ज होणार नाही.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…