Saturday, June 29, 2024
Homeमहामुंबईभूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन

मुंबई : भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे भारतीय वायू सेनेच्या विमानातून सकाळी आगमन झाले.

उपमुख्यमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राजे वांगचुक यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -