Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणKonkan Railway Megablock : कोकण रेल्वेवर दोन दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या काय...

Konkan Railway Megablock : कोकण रेल्वेवर दोन दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या काय परिणाम होणार?

पहिल्या दिवशी तीन तर दुसर्‍या दिवशी अडीच तासांचा मेगाब्लॉक

मुंबई : मुंबई लोकलवर (Mumbai Local) २८ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर अशा मोठ्या मेगाब्लॉकनंतर (Megablock) आता कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गुरुवार ९ आणि शुक्रवार १० नोव्हेंबर असे दोन दिवस हा मेगाब्लॉक असणार आहे. कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरील कुमटा ते बटकळ आणि रत्नागिरी ते वैभववाडी रोड या विभागातील रेल्वे मार्गाच्या आणि मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय झाला आहे. काही गाड्यांच्या प्रवासावर याचा परिणाम झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.

९ नोव्हेंबर रोजी गाड्यांच्या वेळेत होणारा बदल –

कोकण रेल्वे मार्गावरील कुमटा – भटकळ विभागात ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते ३ दरम्यान तीन तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे.

गाडी क्र.१६५८५ बंगळुरू ते मुर्डेश्वर एक्स्प्रेसचा प्रवास ८ नोव्हेंबर रोजी भटकळ स्टेशनवर अल्पकाळ थांबेल आणि भटकळ ते मुर्डेश्वर विभागादरम्यान अंशतः रद्द केला जाईल. गाडी क्र. १६५८६ मुर्डेश्वर ते बंगळुरू एक्स्प्रेसचा प्रवास ९ नोव्हेंबर रोजी भटकळ स्थानकावरून नियोजित वेळेवर सुरू होईल आणि मुर्डेश्वर ते भटकळ विभागादरम्यान अंशतः रद्द होईल.

गाडी क्र. २२११४ कोचुवेली ते लोकमान्य टिळक (LTT) एक्स्प्रेसचा ९ नोव्हेंबर रोजी सुरू होणारा प्रवास भटकळ स्टेशनवर २० मिनिटांसाठी नियमित केला जाईल.

१० नोव्हेंबर रोजी गाड्यांच्या वेळेत होणारा बदल –

रत्नागिरी ते वैभववाडी रोड विभागात १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते ११ असा एकूण अडीच तासांचा मेगा ब्लॅाक असणार आहे.

गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास ९ नोव्हेंबर रोजी उडुपी ते कणकवली विभागादरम्यान अडीच तासांसाठी नियमित केला जाईल.

गाडी क्र.१०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्स्प्रेसाचा प्रवास सावंतवाडी रोड ते कणकवली स्टेशन दरम्यान १० नोव्हेंबर रोजी ३० मिनिटांसाठी नियमित केला जाईल.

गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी ते मडगाव १० नोव्हेंबर रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी स्थानकावर दहा मिनिटांसाठी नियमित केला जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -