Friday, July 19, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया करत होती सेमीफायनल आणि फायनलची...

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया करत होती सेमीफायनल आणि फायनलची तयारी, जडेजाचा खुलासा

कोलकाता: २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील लीग स्टेजमधील आतापर्यंतचे सर्व ८ सामने एकतर्फी जिंकल्याने भारतीय संघाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा प्रचंड उत्साहित आहे. रविवारी विजयानंतर जडेजाने सांगितले की दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया नॉकआऊटची तयारी करत होती. सोबतच त्यांनी नॉकआऊट स्टेजआधी अशा प्रकारच्या कामगिरीने टीम इंडियाविरुद्धचे संघ भारताच्या दबावाखाली राहतील.

गेल्या सामन्यात श्रीलंकेला ३०२ धावांनी हरवल्यानंतर भाताने ईडन गार्डनवर आफ्रिकेचा २४३ धावांनी पराभव केला. आता टीम इंडिया आपला शेवटचा सामना १२ नोव्हेंबरला नेदरलँड्विरुद्ध खेळणार आहे.

पाहा काय म्हणाला जडेजा पत्रकार परिषदेत

रवींद्र जडेजा सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला, ही चांगली बाब आहे की आम्ही सगळे सामने एकतर्फी जिंकले. कारण यामुळे समोरच्या संघावर दबाव राहतो. त्यांच्या कामगिरीवरही परिणाम होतो.

आम्ही प्रत्येक सामन्यागणिक रणनीती बनवतो. नॉकआऊट टप्पा महत्त्वाचा आहे. मात्र संघ प्रत्येक विभागात चांगला खेळ करत आहे आणि हीच लय आम्ही सेमीफायनल आणि फायनलमध्येही कायम राखू.

जडेजाने या पिचव ३००हून अधिक धावसंख्या बनवण्याचे श्रेय विराट कोहली आणि मध्यम फळीतील फलंदाजांना दिले. आफ्रिकेच्या गोलंदाजीदरम्यान विकेटमध्ये टर्न होता. मात्र येथे फलंदाजीसाठी सोपे झाले. विराट आणि मधल्या फळीतील फलंदाजांना याचे श्रेय जाते की त्यांनी मंद आणि कमी उसळणाऱ्या विकेटवर चांगली फलंदाजी केली. आम्ही मानसिकरित्या ययासाठी तयार होतो.

कोहलीच्या बर्थडेमुळे संघाला अतिरिक्त प्रेरणा मिळाली होती का? यावर उत्तर देताना जडेजा म्हणाला, भारताची जर्सी घालून खेळणे म्हणजे बर्थडे असल्यासारखेच. कारण खूप कमी लोकांना ही संधी मिळते. बर्थडेच्या दिवशी जर कोणी संघाला जिंकून दिले तर यापेक्षा चांगले काय असू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -