Sunday, August 31, 2025

मुरबाड ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये शिंदे गटाची व भाजपाची सरशी!

मुरबाड ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये शिंदे गटाची व भाजपाची सरशी!

एकमेव कुडवली ग्रामपंचायतीवर उबाठा शिवसेनेने फडकवला झेंडा!

मुरबाड : मुरबाड तालुक्यात नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये शिंदे गट व भाजपचे सरशी दिसून येत आहे तर अजित पवार गट, शरद पवार गट, व इंदिरा काँग्रेस, मनसे या पक्षांना कुठेही खाते उघडता आले नाही.

ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या नेतृत्वाखाली रामपूर, टेंबरे (बु), नढई, जडई, मढ, चिखले यांच्यासह १५ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने भगवा फडकला आहे. तर आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली पेंढरी, न्हावे,म्हाडस,ओजिवले,साजई, देवगाव,फांगलोशी यांच्यासह १३ ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध केले आहे. तसेच मुरबाड तालुक्यात प्रथमच कुडवली ग्रामपंचायतवर उबाठा गटाचा विजय झाला आहे. शिंदे गटाचे थेट सरपंच पुढील प्रमाणे रामपुर- विनायक पोटे, टेंबरे-सुहास केंबारी, नढई -निता टोहके, जडई -संगिता सांवत, यांच्यासह १५ थेट सरपंच पदावर शिंदे गटाने बाजी मारली आहे.

तसेच भाजपाचे थेट सरपंच पुढील प्रमाणे, साजई-पुष्पा सासे, न्हावे-जगदीश हिंदूराव, ओजिवले-परशुराम कातकरी, म्हाडस-वंदना म्हाडसे, यांच्यासह १३ ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व दाखवले कुडवली ग्रामपंचायतीवर उबाठा गटाचे रामभाऊ सासे यांची थेट सरपंच पदी निवडून आले आहेत. तसेच कोरावळे गावचा सरपंच हा आपसात बिनविरोध करून ग्रामविकास आघाडीचा झालेला आहे. त्याचे श्रेय कोणी घेऊ नये अशी माहिती माजी सरपंच पांडुरंग धुमाळ यांनी पत्रकाराशी बोलताना दिली आहे.तर सुभाष पवार गटाचे कट्टर समर्थक म्हणून खापरी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून सुरेश भांगरथ हे प्रचंड मतांनी निवडून आले आहेत.

तर ठाणे जिल्हा परिषद मार्फत मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच आदिवासी पट्ट्यात विविध स्तरावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागाचा विकास झाल्याच्या धर्तीवर आज लागलेल्या निकालावरून दिसून आले आहे असे उद्गार ठाणे जिल्हा माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.तर शिंदे गटाचे थेट सरपंच पदाचे निवडून आलेले उमेदवारांचे सुभाष पवारांनी अभिनंदन केले आहे. तर मुरबाड तालुक्यातील न्हावे ग्रामपंचायत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या पक्षाचा दारूण पराभव झाला आहे तेथे भाजपाचे उमेदवार जगदीश हिंदुराव यांनी थेट सरपंच पदाच्या निवडणूकीत बाजी मारली आहे.

Comments
Add Comment