
ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का
मुंबई : राज्यातील महापालिकेच्या निवडणुकांची वाट पाहावी लागत असली तरी ग्रामपंचायतींच्या निवडणुका काल रविवारी पार पडल्या. राज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींची आज मतमोजणी होत आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे? हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. यातील काही निवडणुकांचे निकाल हाती आले असून पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे. महायुतीत सामील असणार्या पक्षांनी आतापर्यंत सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजप - ८१ जागा अजित पवार गट - ७७ जागा शिवसेना - ६५ जागा काँग्रेस - ३६ जागा ठाकरे गट - ३० जागा शरद पवार गट - ३१ जागा इतर - ४२ जागा त्यामुळे भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याचे दिसून येत आहे. राज्यभरात जरी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असली, तरी ग्रामपंचायत किंवा सथानिक पातळीवर प्रत्येक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतो. त्यामुळे सध्या भाजपचेच वर्चसव असल्याचे समजत आहे. महायुतीने आतापर्यंत २२३, मविआने ९७ तर इतर गटांनी ४२ जागांवर वर्चस्व मिळवले आहे.