Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीChhagan Bhujbal : आपल्यावर अन्याय होत असेल तर दहशत माजवावीच लागेल!

Chhagan Bhujbal : आपल्यावर अन्याय होत असेल तर दहशत माजवावीच लागेल!

छगन भुजबळांचे थेट वक्तव्य

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात वार पलटवार

जालना : राज्यभरात मराठा आंदोलन (Maratha Andolan) आता शांत झालं असलं तरी ओबीसी समाज (OBC Samaj) सातत्याने मराठा समाजाच्या (Maratha Samaj) मागणीला विरोध करत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या पण ओबीसीत समाविष्ट करु नका अशी मागणी केली आहे. त्यांनी सरसकट मराठा प्रमाणपत्राच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बाकीचे समाज आरक्षणासाठी एक झाले तसे ओबीसी समाजाने एकत्र यावे असं आवाहन भुजबळांनी केलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना छगन भुजबळांनी यावर परखडपणे भाष्य केलं आहे.

काल चर्चेत आलेल्या एका ऑडिओ क्लिपवर भुजबळांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, सगळीकडे ओबीसी आरक्षणावर आक्रमण चालू आहे. आमदारांची घरं पेटवली जात आहेत. ओबीसी कार्यकर्त्यांची हॉटेलं देखील पेटवली जात आहेत. यासंदर्भात आपण कुणीतरी बोललं पाहिजे. ते एका आवाजात बोललं पाहिजे. जसं इतर लोक त्यांच्या समाजाला आवाहन करू शकतात, तसंच मीही ओबीसींमधल्या ३७५ जातींना आवाहन करू शकतो की, आपणही आपलं दु:ख एकमुखानं मांडलं पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

छगन भुजबळ म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. ७० वर्षाच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाले आहे. अजूनही आमचा समाज मागास आहे. ज्यांची नोंद आढळली असेल त्यांना सर्टिफिकेट देण्यास हरकत नाही.

पुढे ते म्हणाले, आपल्यावर अन्याय होत असेल आणि दुःख झालं असेल तर आपल्याला कोणीही डॉक्टर औषध देणार नाही. त्यामुळे आपल्याला दहशत माजवावी लागेल. समोरच्या दरवाजातून एन्ट्री मिळत नाही म्हणून तुम्ही मागच्या दरवाजाने येण्याचा हा प्रकार आहे. सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन उपोषण मोर्चे काढून एकत्र उभे राहावे लागेल नाहीतर आपल्या लेकरा बाळांचे भवितव्य धोक्यात येईल.

काय होती भुजबळांची ऑडिओ क्लिप?

रविवारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं एका कार्यकर्त्यासोबत संभाषण झालं. या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात भुजबळ म्हणतात, आता आपण आवाज उठवला पाहिजे. मी एकटा कुठपर्यंत लढणार? तालुका तालुक्यात गावा गावात त्यांचे बुलडोजर चालत आहेत. यात ओबीसी वाचणार नाही. ‘करेंगे या मरेंगे’ हेच करायला पाहिजे. असंही मरतंय आणि तसंही मरतंय. सगळं झालं त्यांचं. मी उभा राहतोय.

मनोज जरांगे यांनी दिलं प्रत्युत्तर

व्हायरल ऑडिओ क्लिपवर बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की, करेंगे या मरेंगे हा त्यांचा प्रश्न आहे. आमचं वाक्य लढेंगे आणि जितेंगे आहे. महाराष्ट्रात शांततेत आंदोलनं सुरु आहे. बाकी प्रश्न ज्याच्या त्याच्या विचाराचा आहे. आम्ही अतिक्रमण केले नाही, आणखी लढाई सुरू आहे. आमचं घेतलं किंवा अतिक्रमण केलं असं नाहीये, गरीब मराठ्यांच्या मुलांविषयी निष्ठूर राहणे योग्य नाही. या पाठीमागे राज्यात अशांतता पसरवायची असेल. पण आम्ही मराठे विचलित होणार नाही, मग कुणीही काहीही बोलू द्या, अशा शब्दांत जरांगेंनी भुजबळांना उत्तर दिलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -