मुंबई: थंडीत तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी आयआरसीटीचे हे पॅकेज जबरदस्त आहे. आयआरसीटीसी एक स्पेशल हॉलिडे पॅकेज AMAZING ANDAMAN EX DELHI घेऊन आले आहे. यात तुम्ही दिल्ली-अंदमान असा मस्त प्रवास करू शकता. या पॅकेजमध्ये तुम्हाला ५ रात्री आणि ६ दिवसांत अंदमान फिरण्याची संधी आहे. हे पॅकेज १२ डिसेंबर २०२३ आणि १५ जानेवरी २०२४ या तारखांसाठी बुक करू शकता.
कुठे कुठे फिरू शकता?
हॉलिडे पॅकेजमध्ये तुम्ही अंदमानमध्ये पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, नील, नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप आणि नॉर्थ बे आयलँड या ठिकाणी फिरू शकता. या पॅकेजमध्ये तुम्हाला दिल्लीवरून फ्लाईट दिली जाईल. दिल्लीवरून पोर्ट ब्लेअरसाठी फ्लाईट रवाना होईल. त्यानंतर पुन्हा दिल्लीत येऊन ही ट्रिप संपेल.
Escape the touch of winter amidst the exotic tropical islands with Amazing Andaman Ex #Delhi (LTC Approved) (NDA13) tour starting on 12.12.2023 & 15.01.2024.
Book now on https://t.co/3y0ptM0UgB#DekhoApnaDesh #Travel #Andaman #BOOKINGS pic.twitter.com/exDuflfdh0
— IRCTC (@IRCTCofficial) November 3, 2023
आयआरसीटीसीच्या या पॅकेजसाठी प्रति व्यक्ती किंमत ७०,९९० रूपये इतकी आहे. याशिवाय तुम्ही आयआरसीटीसीच्या टूरिझम पोर्टलवर जाऊनही भेट देऊ शकता. याशिवाय जर तुमच्याकडे ०-२ वर्षांपर्यंतचे मूल आहे त्यासाठीचेही पैसे तुम्हाला बुकिंगदरम्यान द्यावे लागतील. हे पॅकेज सिंगल, डबल आणि ट्रिपल ऑक्युपसीमध्ये बुक केले जाऊ शकते. हे पॅकेज ३० लोकांच्या बुकिंगसाठी आहे.