Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरमोखाडा तालुक्यातील ५ पैकी ३ ग्रामपंचायती शिवसेना-भाजपच्या ताब्यात

मोखाडा तालुक्यातील ५ पैकी ३ ग्रामपंचायती शिवसेना-भाजपच्या ताब्यात

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील अतिशय चुरशीच्या झालेल्या ५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने व शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारली, तर भाजपाने एका ग्रामपंचायतीवर आपली सत्ता काबीज केली आहे. तालुक्यातील ५ पैकी राष्ट्रवादी २, शिवसेना २ आणि भाजप १ अशा ग्रामपंचायती जिंकल्याचे एकूणच चित्र आहे.

तालुक्यातील चास, किनिस्ते, सायदे, डोल्हारा आणि कारेगाव या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. चास ग्रामपंचायत ही याआधी राष्ट्रवादीकडे होती यावेळी मात्र शिवसेना शिंदे गटाने ही ग्रामपंचायत जिंकली आहे, तर डोल्हारा येथे शिवसेनेची सत्ता होती तिथे यावेळी भाजपाने विजय मिळविला आहे. याठिकाणी राष्ट्रवादीने निवडणूक लढविली नव्हती. तर किनिस्ते येथे भाजपाची सत्ता होती तिथे शिवसेनेने मोठा विजय मिळविला आहे.

सायदे ग्रामपंचायतीमध्ये यावेळी राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत विजय मिळविला, त्याचबरोबर कारेगाव ग्रामपंचायतीची सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होती येथेही राष्ट्रवादीने जोरदार विजय मिळविला. तर जिजाऊ संघटनेकडून फक्त एकच ग्रामपंचायत लढविण्यात आली होती तिथे त्यांचा पराभव झाला.

निवडून आलेले सरपंच

ग्रामपंचायत              सरपंच                        पक्ष

डोल्हारा               ताईबाई जाधव                  भाजपा

चास                  प्रियांका गोविंद                शिवसेना शिंदे गट

किनिस्ते              योगेश दाते                 शिवसेना शिंदे गट

कारेगाव              मुरलीधर कडू               राष्ट्रवादी शरद पवार

सायदे                 सिंधू झुगरे                 राष्ट्रवादी शरद पवार

आमचा बालेकिल्ला असलेल्या डोल्हारा ग्रामपंचायतीमध्ये आमचा पराभव झाला, मात्र आम्ही चास आणि किनिस्ते या ग्रामपंचायती जिंकल्याचा मनस्वी आनंद आहे. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार. – प्रकाश निकम (अध्यक्ष जिल्हा परिषद पालघर)

जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे, काही ठिकाणी आमच्यात दुफळी होती, त्यामुळे आमचं नुकसान झाले. आम्ही सर्व ठिकाणी चांगल्या लढती दिल्या. आमच्या मतांची टक्केवारी वाढली आहे, या पराभवातून खचून न जाता आम्ही जोमाने लढू सायदे, डोल्हारा याठिकाणी आमचे उपसरपंच होणार आहेत. – संतोष चोथे (भाजपा तालुकाध्यक्ष मोखाडा)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -