
नवी दिल्ली: नेपाळमध्ये(nepal) पुन्हा एकदा भूकंपाचे झटके(earthquake) बसले. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान, नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाचा परिणाम भारतात दिसला नाही.
अफगाणिस्तानच्या(afganistan) फैजाबादमध्येही रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने सांगितले की अफगाणिस्तानात ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.
An earthquake of magnitude 4.5 strikes 328km ENE of Fayzabad, Afghanistan: National Center for Seismology pic.twitter.com/wwGB2lf5sl
— ANI (@ANI) November 4, 2023
नेपाळमध्ये सातत्याने जाणवतायत भूकंपाचे धक्के
नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. यात १५७ लोकांचा मृत्यू झाला तर कमीत कमी ३७५ लोक जखमी झाले होते. शोध आणि बचावकार्य अद्याप सुरू आहे. नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या या भूकंपाने मोठ्या प्रमाणात जिवीत तसेच वित्तहानी झाली. गेल्या महिन्यातही नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसले होते.