मुंबई: सध्याच्या काळात प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही बचत करून अशा ठिकाणी गुंतवणूक(investment) करतो जेथून पैसा सुरक्षित राहण्यासोबतच रिटर्नही जोरदार मिळतील. यात अनेक बँकांच्या फिक्स डिपॉझिट स्कीमला मोठी पसंती दिली जाते.
गेल्या वर्षी महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर एकपाठोपाठ एक रेपो दरात वाढ करण्यात आली होती. तेव्हा अशा वेळेस बँकांना आपल्या एफडीच्या दरात वाढ करत ग्राहकांना दिलासा दिला होता. हे आतापर्यंत कायम आहे. अशातच एक बँक आहे जे फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक जे आपल्या ग्रहकांना एफडीवर ९ टक्क्यांहून जास्त व्याजदर देत आहे.
वरिष्ठ नागरिकांना जबरदस्त फायदा
अनेक बँका आहेत ज्या आपल्या ग्राहकांना ९ टक्के व्याजदर देत आहेत. मात्र ९.२१ टक्के व्याजदर देत फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक सर्वाधिक व्याज देण्याऱ्या बँकांच्या यादीत सामील झाले आहे. एफडीवरील हे तगडे व्याजदर वरिष्ठ नागरिकांना दिले जात आहे. तर सामान्य नागरिकांसाठी येथे गुंतवणुकीवर सर्वाधिक ८.६१ टक्के व्याज दिले जात आहे. नुकताच Fincare Small Finance Bank ने एफडीवर व्याज दरात बदल करण्याची घोषणा करत ग्राहकांना बक्षीस दिले होते.
७५० दिवसांच्या गुंतवणुकीवर मिळणार लाभ
फिक्स डिपॉझिटवरील ९.२१ टक्के व्याजदर मिळवण्यासाठी वरिष्ठ नागरिकांना बँकेत ७५० दिवसांसाठी एफडी करावी लागेल. बँकेकडून बदल करताना एफडीवरील नवी व्याजदर गेल्या २८ ऑक्टोबर २०२३ पासून लागू करण्यात आले आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकमध्ये सामान्य आणि वरिष्ठ नागरिकांना दिले जाणारे व्याजदर पाहिले असला ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत फिक्स डिपॉझिट्सवर सामान्य ग्राहकांना ३ ते ८.६१ टक्के व्याज दिले जात आहे. तर वरिष्ठ नागरिकांसाठी दिले जाणारे व्याजदर ३.६० ते ९.२१ टक्क्यांपर्यंत आहे.
या बँकांही एफडीवर देत आहेत जोरदार व्याज
Fincare Small Finance Bank शिवाय इतर अनेक बँका आपल्या ग्राहकांना एफडीवर जोरदार व्याज देत आहेत. यात सर्वात वर युनिटी स्मॉल फायनान्स बँक आहे जे वरिष्ठ नागरिकांना ९.५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ९.१ टक्के, डीसीबी बक ८.५० टक्के, आरबीएल बँक ८.३० टक्के, आयडीएफसी फर्स्ट बँक ८.२५ टक्के देत आहे.