मुलगी शिकली ‘लेडी बॉस’ झाली!

  85

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे


ग्लोबल आन्त्रप्रिन्युअरशिप मॉनिटर (GEM) आणि Youth Co:Lab द्वारे २०१९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले की, आशिया आणि पॅसिफिक प्रदेशात भारतातील तरुण उद्योजकांची संख्या सर्वात जास्त आहे. सर्वेक्षणानुसार, स्टार्टअपद्वारे ५५ टक्के लोकांनी बाजारपेठेत नावीन्यपूर्ण उत्पादने वा सेवा आणलेल्या आहेत. सुखद बाब म्हणजे यामध्ये तरुणींची संख्यादेखील लक्षणीय आहे. विशीत स्टार्टअप सुरू करणाऱ्या अशा काही तरुणींची ही गोष्ट....


शुभी जैन
इंदूरमध्ये ट्रॅफिक वॉर्डन म्हणून कार्यरत असणाऱ्या २४ वर्षीय शुभी जैनने जानेवारी २०२१ मध्ये तिच्या स्टार्टअप ‘मातीवाला’ची स्थापना केली - घरातील बागकामाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच छताखाली सर्व सुविधा देणारे असे हे स्टार्टअप शुभी जैनने जानेवारी २०२१ मध्ये सुरू केले.


“मला नेहमीच वनस्पती आणि निसर्गाशी घट्ट गट्टी वाटत आली आहे आणि म्हणून मला या क्षेत्रात काहीतरी करायचे होते. मी ते इंदूरमध्ये केले आहे. आमच्या वेबसाइटवरून सर्व बागकाम सेवा आणि उत्पादने मिळू शकतात”, शुभी सांगते. तिच्या टीममध्ये सध्या पाच बागकाम करणारे आहेत, ज्यांना तिने मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बिना येथील तिच्या गावावरून बोलावले आहे. “मला आनंद वाटतो की, ते आता त्यांच्या कुटुंबासह शहरात राहत आहेत आणि या कामामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.” ती संध्याकाळी ट्रॅफिक वॉर्डन असते, दिवसा उद्योजिका असते. मात्र शुभीची सकाळ रेडिओ मिर्चीसोबत रेडिओ जॉकी म्हणून सुरू होते.


प्राची शेवगावकर
पुण्याची २३ वर्षीय तरुणी प्राची शेवगावकर सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथे जनसंवादाचे शिक्षण घेत होती, जेव्हा तिने तिच्या कॉलेजच्या पहिल्या सत्रात गुगल केले, “आजच्या जगात सर्वात मोठी समस्या कोणती आहे?” तेव्हा तिला उत्तर मिळाले ‘हवामानातील बदल’. तेव्हा तिला एक अॅप तयार करण्याची कल्पना सुचली जी एखाद्याचे हरितगृह वायू उत्सर्जन मोजू शकेल. तीन वर्षांनंतर, कूल दी ग्लोब (Cool The Globe) चे जगभरात २४,००० वापरकर्ते आहेत.


“मी हवामान बदलाबद्दल अधिक वाचायला सुरुवात केली. त्यावेळी असे आढळले की, हवामान बदलाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी आपल्याकडे फक्त तीन दशके आहेत. ते वाचून मी अस्वस्थ झाले. या समस्येवर निदान माझ्या पातळीवर तरी मला काहीतरी करायचे होते. मी आणि माझ्या कुटुंबाने आमच्या स्वतःच्या हरितगृह वायूचे उत्सर्जन दरवर्षी १० टक्क्यांनी कमी करण्याचे ठरवले. कूल द ग्लोब हे हवामान कृतीसाठी एक विनामूल्य ॲप आहे जे व्यक्तींना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यात मदत करते. ॲप वापरकर्त्यांना त्यांचे GHG उत्सर्जन कमी करण्यासाठी महिन्याला आणि वर्षाला एक लक्ष्य देते. वापरकर्ते त्यांच्या दैनंदिन जीवनात एम्बेड केलेल्या १००+ सानुकूल करण्यायोग्य हवामान क्रियांमध्ये बचत करू शकतात. ते प्रत्येक क्रियेने टाळलेले उत्सर्जन देखील पाहू शकतात. प्राचीला नुकताच इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनने ऑलिव्ह क्राऊन ॲवॉर्डने सन्मानित केले आणि तिला वर्षातील ‘यंग ग्रीन क्रुसेडर’ म्हणून घोषित केले. फिनलंडचे माजी पंतप्रधान आणि जागतिक नेत्यांसह हवामान नेतृत्व युतीच्या सल्लागार मंडळावर नियुक्त झालेली ती पहिली भारतीय ठरली आहे.


अनुवा कक्कर
कोरोनाच्या आधी अनुवा कक्करने एक परवडणारा हॉट चॉकलेट ब्रँड टिगल सुरू केला, तेव्हा ती फक्त २१ वर्षांची होती. तिने मेट्रो स्टेशनच्या बाहेर पेये विकण्यास सुरुवात केली. २ लाखांपेक्षा जास्त कप विकल्याचा तिचा दावा आहे. “मी एक हॉट चॉकलेटप्रेमी आहे आणि एका रात्री उशीरा जेव्हा मला हॉट चॉकलेट खाण्याची इच्छा होती,


तेव्हा मला कळले की, फक्त कॅफेमध्येच एक चांगला कप मिळू शकतो. त्यावेळी महिन्यातून फक्त काही वेळा कॅफेमध्ये जाण्याची माझी ऐपत होती,” अनुवा सांगते. या विचारातूनच टिगलची सुरुवात झाली. अत्यंत लहान प्रमाणात टिगलची सुरुवात झाली होती. अनुवाने पाच लिटरची स्टीलची भांडी, तीन लिटर दूध आणि हॉट चॉकलेट तयार करण्यासाठी लागणारे सर्व काही साहित्य खरेदी करून सुरुवात केली. तिने गुडगावमधील मेट्रो स्टेशनच्या बाहेर दुकान थाटले. एका वर्षाच्या आत, टिगल १४ हजारांपेक्षा जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात आणि २ लाख कप हॉट चॉकलेट विकण्यात यशस्वी झाले.


रिया आणि श्रेया
बेंगळूरुस्थित भगिनी जोडी रिया (२२) आणि श्रेया मित्तल (१९) या परदेशात शिकत होत्या. कोरोना काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे त्या घरी परतल्या. ऑनलाइन क्लासेसमध्ये त्यांना एक गोष्ट जाणवली की, क्रीडापटूंच्या कपड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. या कल्पनेतून त्यांनी २०२० मध्ये ‘कावा’ हा ऑनलाइन ऍथलीझर ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला. रियाने युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स, लंडनमधून फॅशन मॅनेजमेंटमध्ये बीएससीचे शिक्षण घेतले. श्रेया ब्रिटनच्या वॉर्विक विद्यापीठात सध्या शिकत आहे.


“आम्ही हे लक्षात घेतले की, आमचे मित्र आणि इतर अनेक तरुण जे स्ट्रीट स्टाईल ऍथलीझर पोशाख परिधान करायचे त्यांना खरेदी करण्यासाठी चांगला ब्रँड सापडला नाही. आम्हाला खरोखर वाटले की, या क्षेत्रात प्रवेश करण्याची हीच योग्य वेळ आहे,” रियाने सांगितले. कावा ४० लाख रुपयांच्या भांडवलाने सुरू झालेला आहे. रियाचा दावा आहे की, कावाचे कपडे टिकाऊ, प्रीमियम फॅब्रिक्सचे बनलेले आहेत.


या आजच्या काळातील तरुणी कोणत्याही उद्योजक बनू पाहणाऱ्या मुलींसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी संधी हेरली व नावीन्यपूर्ण शक्कल लढवली. मेहनत घेतली आणि आज त्या आपापल्या क्षेत्रांत यशस्वी आहेत. त्यामुळे ‘मुलगी शिकली प्रगती झाली’च्या ऐवजी मुलगी शिकली ‘लेडी बॉस’ झाली म्हणायला हरकत नाही.


theladybosspower@gmail.com

Comments
Add Comment

निकालात गरुडभरारी, अ‍ॅडमिशनचे काय?

दहावी-बारावीचे निकाल लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा सावित्रीच्या लेकीच हुशार ठरल्याने मुलांहून त्यांचा

ऑपरेशन सिंदूर : आधुनिक युद्धतंत्रातील निर्णायक विजयश्री

जॉन स्पेन्सर भारताने ऑपरेशन सिंदूर समाप्त झाल्याचे अद्याप जाहीर केलेले नाही. मोहिमेमध्ये घेतलेला एक संवेदनशील

विवरणपत्र भरण्याची तयारी

उदय पिंगळे : मुंबई ग्राहक पंचायत आपले सर्व मार्गाने होणारे उत्पन्न आणि त्यावर भरलेला कर करदात्याने प्रमाणित

शस्त्रसंधी कुणासाठी...

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू करताच अवघ्या चार दिवसांत भारत-पाकिस्तान दरम्यान

शस्त्रसंधी म्हणजे युध्दविराम नव्हे...

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त केली. यापुढेही भारत

गुन्हेगार शोधण्यात होतोय एआयचा वापर

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे लिसांना लपलेल्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी आणि त्यांचे लोकेशन (स्थान)