Tuesday, October 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजShort and Sweet : ‘शॉर्ट अॅण्ड स्वीट’मध्ये सोनालीचे आई-बाबा

Short and Sweet : ‘शॉर्ट अॅण्ड स्वीट’मध्ये सोनालीचे आई-बाबा

  • ऐकलंत का! : दीपक परब

सध्या प्रेक्षक गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॅार्ट अॅण्ड स्वीट’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका असून यात आणखीही दोन नवोदित कलाकार झळकणार आहेत. हे नवोदित कलाकार आहेत सोनालीचे आई – बाबा. पुण्यात चित्रीकरण असल्याने सोनालीचे आई-बाबा तिला सहजच सेटवर भेटायला गेले होते. त्यावेळी बसमधील प्रवास करतानाचा सीन चित्रित होत होता. सोनालीचे आई-बाबा तिथेच असल्याने दिग्दर्शकांनी त्यांना अभिनय करण्याची संधी दिली. दिग्दर्शकांनी दिलेल्या संधीला मान देत त्यांनीही अभिनय करण्याची संधी स्वीकारली. या चित्रपटात ते सहप्रवाशाच्या भूमिकेत झळकणार आहेत. आपल्या मुलीसोबत काम करण्याचा आनंद काही औरच आहे, अशा शब्दांत सोनालीच्या आई-बाबांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, तर सोनालीही आई-बाबांसोबत काम करण्याच्या अनुभवाने कमालीची आनंदली आहे. शुभम प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. हा चित्रपट शुक्रवार ३ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -