Thursday, November 14, 2024
Homeक्रीडाICC World Cup 2023 : ५.५ ओव्हर्समध्ये नाबाद ६२ धावा आणि भारताला...

ICC World Cup 2023 : ५.५ ओव्हर्समध्ये नाबाद ६२ धावा आणि भारताला पहिला धक्का!

रोहित मैदानाबाहेर… तर विराट आणि शुभमन फॉर्ममध्ये…

कोलकाता : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सुपर संडेला वर्ल्ड कप २०२३ (ICC World Cup 2023) मध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर सामना खेळला जात आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आतापर्यंत ५.५ ओव्हर्समध्ये ६२ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीयांकडून जिंकण्याची आशा वाढली आहे.

मागच्या दोन सामन्यांमधील फलंदाजी लक्षात घेता भारत पहिल्यांदा गोलंदाजी स्विकारेल, असा सर्वांना अंदाज होता. मात्र, कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्याला आव्हानांचा सामना करायचा आहे, असं म्हणत तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. त्याने ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २४ चेंडूंत ४० धावा चोपल्या. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल (Shubhman Gill) या ताकदीच्या फलंदाजांमुळे मैदानात धावांचा पाऊस होता, मात्र, तेवढ्यात कगिसो रबाडाने रोहितची खेळी संपवली आणि भारताला पहिला धक्का दिला.

भारताने आतापर्यंतचे सातही सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने सातपैकी सहा सामने जिंकले आहेत. आज जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहील. तर दुसरीकडे भारताचा तुफान फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) आज ३५वा वाढदिवस आहे. त्यामुळे आजचा सामना त्याच्यासाठी खास असणार आहे. रोहितनंतर आता विराटने मैदानात फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -