Wednesday, May 21, 2025

विशेष लेखताज्या घडामोडी

Health: तुम्हीही टॉयलेटमध्ये मोबाईल वापरता का? आताच थांबवा नाहीतर होईल गंभीर आजार

Health: तुम्हीही टॉयलेटमध्ये मोबाईल वापरता का? आताच थांबवा नाहीतर होईल गंभीर आजार

मुंबई: प्रत्येकाची बाथरूमशी संबंधित सवयी वेगवेगळ्या असतात. काही लोक टॉयलेटमध्ये(toilet) बसून मॅगझिन वाचतात तर काही जणांना गाणी ऐकायला आवडतात. अनेकांना टॉयलेटमध्ये बसून मोबाईल फोन(mobile) वापरण्याची सवय असते नाहीतर फोनवर बोलण्याची. या लोकांच्या मते ते टॉयलेटमधील रिकाम्या वेळेचा सदुपयोग करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की टॉयलेटमध्ये फोनचा वापर करणे तुमच्या आरोग्यासाठी(health) किती धोकादायक आहे ते.



आरोग्य तज्ञांच्या मते टॉयलेटमध्ये फोनचा वापर करणे धोकादायक


आरोग्य तज्ञांच्या मते टॉयलेटमध्ये बसून फोनचा वापर केल्यास मूळव्याधीचा धोका वाढू शकतो. याला सामान्य भाषेत पाईल्स असे म्हणतात. मूळव्याधीचा त्रास हा खूप वेदनादायी असतो. यात अनेकदा शौचाच्या जागेतून रक्त पडते.


कोणत्याही घरातील टॉयलटेची जागा ही किटाणूंनी भरलेली असते. येथे विविध प्रकारचे बॅक्टेरिया असतात. अशातच टॉयलमध्ये बसून फोन वापरल्यास त्यावरील बॅक्टेरिया तुमच्या फोनचा चिटकू शकतात. यानंतर ते बॅक्टेरिया तुमच्या शरीरात जाऊ शकतात. यामुळे कोणताही आजार पटकन होऊ शकतो.



कशी सुधारणार सवय


यासाठी टॉयलेटमध्ये फोन वापरण्याची सवय बंद करा. यामुळे मूळव्याधीचा धोका कमी होतो. सोबतच बॅक्टेरिया वाढण्याचा धोकाही कमी होतो. याशिवाय जर तुमच्या घरात वेस्टर्न टॉयलेट असतील तर सीटवर बसताना पायाच्या खाली एक स्टूल घेऊन बसा. यामुळे बसण्याची स्थिती योग्य होईल आणि व्यवस्थित पोट साफ होईल.

Comments
Add Comment