हवेला वजन असते. हवेमध्ये जे वायू असतात ते सर्व परमाणूंच्या रूपात असतात आणि परमाणूंना वजन असते. हवा सर्वत्र वाहत असते. सूर्याच्या उष्णतेमुळे हवा जेव्हा तापते, तेव्हा हवेतील रेणू एकमेकांपासून दूर जातात. आपण पृथ्वीवर जरी हवे तसे, हवे तिकडे फिरतो तरी आपल्यावर हवेचा प्रचंड दाब असतो.
आमच्या देशमुख सरांचा रसायनशास्त्राचा अभ्यास खूप सखोल होता. त्यांच्या विषयाच्या मूळ संकल्पनासुद्धा अगदी स्पष्ट होत्या. त्यामुळे ते रसायनशास्त्र अगदी सरळपणे व अतिशय रंजकतेने शिकवित असत. शिकवताना वेगवेगळ्या संकल्पना व बहुविध प्रणालींमधील तुलनात्मक सारखेपणा नि फरक आणि त्यानुसार तत्त्व, रचना, कार्य, सूत्रे, समीकरणे, उपयोगिता आदी मजकुरात राहिलेले साम्य वा झालेले बदल यांचे सुंदरपणे विवेचन करीत. तसेच निरनिराळ्या आकृत्या व विविध प्रक्रियांमधील साम्य नि फरक यांचेही सुरेखतेने विश्लेषण करीत. वेगवेगळ्या सूत्रांवरील गणितात्मक उदाहरणे कशी लक्षात घ्यावीत, सूत्रांचा, राशींच्या परिमाणांचा, एककांचा, त्यांच्या रूपांतरांचा कसा उपयोग करावा व ती कशी सोडवावीत हेही ते अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगत. अनेक विविध प्रणाली व आकृत्या नि समीकरणे कशी लक्षात ठेवावीत यांच्या क्लृप्त्याही ते सांगत. रसायनशास्त्राचा अभ्यास करण्याची त्यांनी शिकवलेली ही तुलनात्मक अभ्यासाची पद्धती आम्हाला इतरही विषयांचा अभ्यास करण्यासाठीही उपयोगी पडली नि आम्ही हळूहळू गणित व भौतिकशास्त्रामध्येसुद्धा हुशार झालो. इंग्रजीचे शब्दांचे पाठांतर व त्यांचा वाक्यात उपयोग आमच्या खूपच कामी येऊ लागले नि आमचे इंग्रजीही सुधारले.
आता त्यांच्या प्रत्येक तासाला वर्गात सारी मुलं-मुली हजर असायची. सर वर्गावर आल्यावर त्यांनी नेहमीसारखी मुलांची हजेरी घेतली व आपले शिकवणे सुरू केले.
“तर काल आपण ‘आपल्या पृथ्वीचे वातावरण’ याविषयीचे प्रकरण सुरू केले होते; परंतु तास संपल्यामुळे ते अपूर्णच राहले होते.” सर म्हणाले.
“हो सर.” सारी मुले आनंदाने एकसुरात म्हणाली.
“सर, या वातावरणातील हवा आपणास का दिसत नाही?” जितेंद्रने पहिला प्रश्न केला.
“हवेला रंग, रूप व आकार नसतो. त्यामुळे ती आपणास दिसत नाही.” सरांनी उत्तर दिले.
“हवेला वजन असते का सर?” नंदाने प्रश्न विचारला.
“हो. हवेला वजन असते. हवेमध्ये जे वायू असतात ते सर्व परमाणूंच्या रूपात असतात आणि परमाणूंना वजन असते. म्हणूनच हवेलाही वजन असते.” सर उत्तरले.
“हवेचा दाब कसा काय निर्माण होतो सर?” मंदाने विचारले.
सर म्हणाले, “पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हवेचे रेणू पृथ्वीकडे आकर्षिले जातात. या आकर्षणामुळे पृथ्वीच्या सर्व पृष्ठभागावर प्रचंड बल कार्य करीत असते. त्या बलास वातावरणाचा किंवा हवेचा दाब असे म्हणतात.”
“हा दाब सगळीकडे सारखा असतो का वेगवेगळा सर?” सुरेंद्राने शंका काढली.
“हवा सर्वत्र वाहत असते. सूर्याच्या उष्णतेमुळे हवा जेव्हा तापते, तेव्हा हवेतील रेणू एकमेकांपासून दूर जातात. गरम हवा ही थंड हवेपेक्षा हलकी असते. त्यामुळे ती पृथ्वीवर कमी प्रमाणात दाबली जात असते, म्हणजेच कमी दाब निर्माण करते. जेव्हा थंड हवा वाहते, तेव्हा तिच्यातील रेणू एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात. त्यामुळे हवा जड होते. ती पृथ्वीच्या दिशेने जोराने ढकलली जाते. त्यामुळे जास्त दाब निर्माण होतो.” सरांनी स्पष्ट कारण दिले. “मग हा हवेच्या दाबाचे अस्तित्व आपणास का नाही जाणवत सर?” नरेंद्रने आपली शंका प्रदर्शित केली.
“आपण पृथ्वीवर जरी हवे तसे, हवे तिकडे फिरतो तरी आपल्यावर हवेचा प्रचंड दाब असतो. एका चौरस इंचावर १५ पौंड इतका मोठा हवेचा दाब आपणावर असतो. पण तो आपल्याला जाणवत नाही कारण, हवेचा दाब हा आपल्या आजूबाजूला सगळीकडे, सर्व ठिकाणी, सर्व वस्तूंवर, सर्व दिशांनी सारखाच विभागलेला असतो. त्यामुळे त्याचे अस्तित्व आपणास जाणवत नाही. तसेच आपण श्वासोच्छ्वासाद्वारे, नाका-तोंडावाटे सतत हवा आत घेत असतो व बाहेरही सोडत असतो. वातावरणातील हवा माणसाच्या शरीराच्या सर्व भागांमध्ये शिरत असते. त्यामुळे वातावरणातील हवेचा दाब व आपल्या शरीराच्या आतील हवेचा दाब हा नेहमी सारखाच राहतो. म्हणूनही आपणास बाहेरील हवेचा दाब जाणवत नाही.” सरांनी सांगितले.
रोजच्यासारखा तास संपला व देशमुख सर दुसऱ्या वर्गावर जाण्यासाठी या वर्गातून बाहेर निघाले.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…