Tuesday, July 9, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023world cup : केएल राहुल बनला भारतील संघाचा उपकर्णधार...

world cup : केएल राहुल बनला भारतील संघाचा उपकर्णधार…

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने विकेटकीपर बॅट्समन केएल राहुलची नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीमुळे २०२३ च्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी प्रसिध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. बोर्डाने केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवले आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर पांड्याला न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध पुनरागमन करता आले नाही. शनिवारी आयसीसीने पांड्या यापुढे विश्वचषक खेळू शकणार नसल्याचे जाहीर केले. पांड्या बाहेर पडल्यानंतर वरिष्ठ निवड समितीने केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती केली.

२०२३ च्या विश्वचषकात उपांत्य फेरीतील सामना सोडून टीम इंडियाला अजूनही दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती केली. केएल राहुलकडेही संघाचे नेतृत्व करण्याचा बराच अनुभव आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -