एक पुण्यात तर दुसरी धाराशिवला
मानाची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र केसरीचे आयोजन पुण्यात केले आहे. यंदा दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. एक पुण्यात दुसरी धाराशिवमध्ये रंगणार आहे.
महाराष्ट्र केसरी २०२३ मधील ६६ वी स्पर्धा पुण्यामध्ये पार पडणार आहे. पुण्याजवळ फुलगाव येथे जंगी कुस्त्या पाहायला मिळणार आहेत. तीन दिवस या थरारारा बाकी असून ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान हा फड रंगणार आहे. ३६ जिल्हे आणि ६ महानगरपालिका असे मिळून ४२ संघ सहभागी होणार आहेत. माती आणि गादी गटांत स्पर्धा होणार असून या थरारामध्ये ८४० मल्ल सहभागी होणार आहेत. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते होणार उदघाटन होणार आहे.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. तर दुसरी महाराष्ट्र केसरी धाराशिवमध्ये पार पडणार आहे. १६ ते २० नोव्हेंबर या काळात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी स्कॉर्पिओ एन आणि १ लाख, २० बुलेट अशी बक्षिसे असणार आहेत.