मुंबई: मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे नागराज मंजुळे. यांचे सिनेमे नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर मोठा प्रभाव टाकतात. नागराज मंजुळे यांचा नाळ हा सिनेमा २०१८मध्ये प्रदर्शित झाला होता.
या सिनेमाच्या कथाने प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडले होते. या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारावरही आपले नाव कोरले होते. यात चैतूची भूमिका तर साऱ्यांनाच आवडली होती. चैतूचे बोलणे,वागणे सारेच प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. तसेच या सिनेमातील जाऊ दे ना वं हे गाणं तर प्रेक्षकांनी उचलून धरले होते.
या सिनेमाच्या अखेरीस अनेक प्रश्नांची उत्तरे चाहत्यांसाठी अनुत्तरित राहिली होती. ती उत्तरे देण्यासाठी आता या सिनेमाचा दुसरा भाग चाहत्यांच्या भेटीस येत आहे. अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा चाहत्यांना लागून राहिली होती. अखेर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
या सिनेमात श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १० नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.