Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीChandani Chowk Pune flyover : चांदणी चौकातील पुलाला उद्घाटनानंतर अडीच महिन्यांतच पडले...

Chandani Chowk Pune flyover : चांदणी चौकातील पुलाला उद्घाटनानंतर अडीच महिन्यांतच पडले खड्डे!

सुरक्षित रस्त्यांच्या मागणीसाठी रहिवाशांनी काढला मोर्चा

पुणे : सध्या राज्यातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी वाढलेल्या गाड्यांमुळे वाहतूक नियंत्रणाची (Traffic Control) समस्या उद्भवत आहे, तर दुसरीकडे रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे वाहतुकीत अडचणी येत आहेत. पुण्यातील चांदणी चौकात नुकत्याच एका पुलाचे (Chandani Chowk Pune flyover) उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, अडीच महिन्यांतच या पुलाला खड्डे पडायला लागले. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी वेधभवन परिसरात सुरक्षित रस्त्यांच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

कोट्यावधी रुपये खर्च करुन चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत केल्याचा दावा करण्यात येत असला तरी कोथरुडवरुन (Kothrud) येण्यासाठी प्रचंड समस्यांना सोमोरं जावं लागत असल्याचं चित्र आहे. उद्धाटनानंतर अडीच महिन्यांतच येथील पुलाची अवस्था बिकट झाली आहे. शेकडो कोटी रुपये खर्च करुन उभारलेल्या या प्रकल्पातून पुणेकरांना काय साध्य झालं? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे वेधभवन परिसरातील हजारो नागरिकांनी सुरक्षित रस्ता मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढला.

चांदणी चौकातील पुलाचे १२ ऑगस्ट रोजी उद्घाटन झाले होते. परंतु अडीच महिन्यांच्या आतच निकृष्ट कामामुळे पुलाला खड्डे पडायला सुरुवात झाली आणि लक्षात आलं की, या पुलाच्या एक्स्पांशन जॉइंटचं (Expansion Joint) काम राहून गेलं आहे. त्यामुळे आता या पुलाला ज्या आठ लेन आहेत त्या आठही लेन नव्याने उकरुन एक्स्पांशन जॉइंटचं काम करावं लागणार आहे.

दरम्यान, या पुलाला काही फूट अंतराचे म्हणजे ज्यांच्या फटीतून खालचा रस्ता दिसू शकेल इतके भयानक खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. ही परिस्थिती उदभवण्याचं कारण NHAI च्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केलं. या पुलाच्या उद्धाटनाची घाई करण्यात आल्याने एक्स्पांशन जॉइंटचं काम राहिलं असं ते म्हणाले. यासाठी पुलामध्ये नव्याने आणखी लोखंडी अँगल टाकले जाणार आहेत, आणि त्यातून हे खड्डे सांधले जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांचा त्रास वाढणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -