हैदराबाद : भाजप कोअर कमिटीने तेलंगणा विधानसभा निवडणुकीची (Telangana assembly election) जबाबदारी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर सोपवली आहे.
३० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या तेलंगणा राज्य विधानसभा निवडणुकी संदर्भात भाजप कोअर कमिटीची बैठक आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी भवन, हैदराबाद येथे संपन्न झाली.
या बैठकीत निवडणुकीच्या संदर्भात नियोजन आखणी करून प्रचाराची रणनीती ठरवण्यात आली. या वेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री व तेलंगणा निवडणूक प्रभारी, खासदार प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग, भाजप राष्ट्रीय सचिव व तेलंगणा सह प्रभारी अरविंद मेनन, आमदार नितेश राणे उपस्थित होते.