Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीNortheast मध्ये फिरण्याचा प्लान करताय तर IRCTCने आणले जबरदस्त पॅकेज

Northeast मध्ये फिरण्याचा प्लान करताय तर IRCTCने आणले जबरदस्त पॅकेज

मुंबई: आयआरसीटीसीने सध्या फिरण्यासाठी शानदार पॅकेज आणत आहे. यातच आयआरसीटीसी एकापेक्षा एक बढिया टूर पॅकेज आणत आहे. यात तुम्हाला पूर्वोत्तर राज्यांमध्ये फिरण्याची संधी मिळू शकते.

आयआरसीटीसी पूर्वोत्तर टूर पॅकेज

आयआरसीटीसीने पूर्वोत्तरमध्ये फिरण्यासाठी खास पॅकेज आणले आहे. यात तुम्हाला रेल्वेने आसाम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये फिरवले जाणार आहे. यासाठी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून ट्रेन पकडावी लागेल. हे पॅकेज १४ रात्री आणि १५ दिवसांचे आहे. यात एसी१, एसी २, एसी ३ असे श्रेणी असती. या रेल्वेमध्ये २०४ पर्यटक प्रवास करू शकतात.

पूर्वोत्तर टूर पॅकेजमध्ये आसामच्या गुवाहाटी, शिवसागर, जोरहाट आणि काझीरंगा, त्रिपुराचे उनाकोटी, आगरतळा आणि उदयपूर, नागालँडचे दीमापूर आणि कोहिमा तसेच मेघालयातील शिलाँग आणि चेरापुंजी येथे फिरवले जाणार आहे.यासाठी इच्छुक प्रवासी www.irctctourism.com वरून ऑनलाईन बुकिंग करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -