Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Ravindra Vaikar : ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांविरोधात ईडीकडून केस दाखल

Ravindra Vaikar : ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांविरोधात ईडीकडून केस दाखल

ऐन दिवाळीत ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ


मुंबई : जोगेश्वरीमधील (Jogeshwari) सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोपाखाली ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत सापडले आहेत. सप्टेंबर महिन्यात या प्रकरणी कारवाई करत ईडीने वायकरांसह त्यांची पत्नी व इतर सहा संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर पुढील कारवाई करत ईडीने वायकर यांच्याविरोधात केस दाखल केली आहे. त्यांच्यासह इतर आरोपींना ईडी चौकशीसाठी समन्स देखील पाठवू शकते. त्यामुळे ऐन दिवाळीत ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ झाली आहे.


जोगेश्वरी भागात मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलं व त्याची परवानगी त्यांनी पालिकेकडून घेतली नव्हती, असा आरोप त्यांच्यावर आहे. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत प्रवर्तन प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) दाखल केला गेला आहे.


अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रवींद्र वायकरांशी संबंधित सर्व दस्ताऐवज आणि जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून हे दस्ताऐवज ईडीला प्राप्त झाले आहेत. या प्रकरणात त्यांची पत्नी मनिषा वायकर, बिझनेस पार्टनर आसू नेहलानाई, राज लालचंदानी आणि प्रथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे सामील आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Comments
Add Comment