Tuesday, March 18, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वCar loan : कॅप्री ग्लोबलतर्फे १०,००० कोटींचे कार लोन्स वितरणाचे ध्येय

Car loan : कॅप्री ग्लोबलतर्फे १०,००० कोटींचे कार लोन्स वितरणाचे ध्येय

मुंबई : कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड Capri Global Capital Limited (CGCL) या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीने ऑक्टोबर २३ मध्ये १००० कोटी रुपयांची कर्जे वितरित केली. कारसाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जांच्या वितरणात (Car loan) लक्षणीय वाढ झाल्याचे कंपनीने नमूद केले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये १०,००० कोटी रुपयांची कर्जे वितरित करण्याचे लक्ष्य सीजीसीएलने ठेवले आहे. कामकाज सुरू केल्यानंतर ३० महिन्यांच्या आतच कार कर्ज वितरणाच्या व्यवसायाचा आवाका चांगलाच वाढला आहे. भारतातील ३२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ७२२ ठिकाणांहून कर्जे वितरित केली जात आहे.

कॅप्री ग्लोबल कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश शर्मा ह्या यशाबद्दल म्हणाले, “FY24च्या दुसऱ्या तिमाहीतील (Q2) आकडेवारीनुसार, आमचा कार कर्जाचा एकत्रित व्यवसाय 4500 कोटींवर पोहचला आहे. आम्ही 13000 कोटी रुपयांची कार कर्जे वितरित केली आहेत. कार कर्जांना असलेली मागणी, विशेषत: मध्यम विभागातील एसयूव्हींच्या खरेदीसाठी होत असलेली मागणी, वाढत आहे. ही वाढ विशेषत्वाने श्रेणी 2 व श्रेणी 3 शहरांमध्ये दिसून येत आहे. समावेशक कर्जवितरण पद्धतींप्रती कंपनीने दाखवलेल्या बांधिलकीची परिणती ग्राहकांच्या विस्तृत श्रेणींमध्ये झाली आहे. अगदी प्रारंभिक स्तरावरील गाड्यांपासून ते प्रीमियम गाड्यांपर्यंत सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी कर्जे घेतली जात आहेत. आम्ही ह्या बाजारपेठांमधील आमचे शाखांचे जाळे व मनुष्यबळ 50 टक्क्यांहून अधिक वाढवले आहे. सध्या 1800 कर्मचारी आमच्या ग्राहकांना अपवादात्मक दर्जाची कार कर्ज सेवा देत आहेत. बँका व त्यांच्या ग्राहकांसाठी कार कर्जांच्या क्षेत्रातील विश्वासाचा सहयोगी म्हणून असलेले आमचे वादातीत आघाडीचे स्थान नुकत्याच मिळालेल्या यशामुळे अधिक भक्कम झाले आहे. तुलनेने अल्पकाळात हा लक्षणीय टप्पा गाठला जाणे ही उत्कृष्टतेप्रती राखलेल्या बांधिलकीला तसेच बाजारातील उत्क्रांत होत जाणाऱ्या मागणीशी जुळवून घेण्याच्या आमच्या क्षमतेला मिळालेली पावती आहे.”

आपल्या सेवांचा विस्तार करण्याप्रती सीजीसीएलने दाखवलेली बांधिलकी अनेक सहयोगांमध्ये महत्त्वाची ठरली आहे. ह्या सहयोगांमध्ये, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक व येस बँक ह्या आठ आघाडीच्या व्यावसायिक बँकांशी झालेल्या सहयोगांचा समावेश आहे. ह्या सहोयगांमुळे सीजीसीएलचे बाजारपेठेतील स्थान तर भक्कम झालेच आहेत, शिवाय, अधिक व्यापक ग्राहकवर्गासाठी कार कर्जांची उपलब्धता वाढली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -