Thursday, October 10, 2024
Homeताज्या घडामोडीElvish Yadav FIR : बिग बॉस विजेता एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये द्यायचा...

Elvish Yadav FIR : बिग बॉस विजेता एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये द्यायचा सापांचं विष…

पाच कोब्रा साप आणि काय काय… छापेमारीत जे सापडलं ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

नोएडा : बिग बॉस ओटीटी २चा (Bigg Boss OTT 2) विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) अडचणीत आला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये (Drugs parties) विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. क्लब आणि पार्ट्यांमध्ये स्नेक बाईट (Snake Bite) देण्यासह अनेक गंभीर आरोप करत एल्विशविरोधात नोएडामध्ये (Noida) एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून एल्विश यादव मात्र फरार आहे.

पीएफए टीमने (PFA Team) नोएडाच्या सेक्टर ४९ मध्ये एका पार्टीवर छापा टाकून कोब्रा सापाबरोबर सापाचे विषही जप्त केले. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये, या प्रकरणातील मुख्य आरोपी बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादव असल्याचे म्हटले जात आहे. एल्विशनेच ही नोएडा आणि एनसीआरमध्ये हायप्रोफाईल स्नेक बाईट पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बँक्वेट हॉलमधून राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ या ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पीएफए संस्थेला माहिती मिळाली होती की, एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवतो. विषारी सापांचे व्हिडीओ शूट करतो. पुढे पोलिसांनी सांगितले की, “एका माहितीदाराने एल्विशसोबत संपर्क साधला असता त्याने एजंट राहुलचा नंबर दिला होता. त्यानंतर माहिती देणाऱ्याने राहुलला पार्टी आयोजित करण्यास सांगितले. या पार्टीमध्येच पोलिसांनी छापा टाकून पाच आरोपींना अटक केली आहे. आता याप्रकरणी एल्विश यादवसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय सापडलं छापेमारीत?

मिळालेल्या माहितीनुसार एका एनजीओने स्टिंग ऑपरेशन करत नोएडा पोलिसांकडे तक्रार केली होती. पीपल फॉर अॅनिमल वेलफेयर ऑफिसर पदावर काम करत असलेल्या गौरव गुप्ता यांनी ही एफआयआर दाखल केली होती. गौरव गुप्ता यांना असे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या छापेमारीत सापाचे विष, पाच कोब्रा, एक अजगर आणि दोन तोंड असलेला एक साप, एक घोडा पछाड साप आढळला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -