मुंबई: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताच्या मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे कंबरडे मोडले. सिराज आणि शमीने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर जबरदस्त विजय मिळवत दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे.
भारताने श्रीलंकेला तब्बल ३०२ धावांनी हरवले. श्रीलंकेचा संघ भारताने दिलेल्या ३५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या १९.४ षटकांत ५५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शमीने १८ धावा देत ५ विकेट मिळवल्या. शमीने १८ धावा देत ५ विकेट मिळवल्या.
सामन्यात टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने ८ बाद ३५७ धावा केल्या होत्या. संघासाठी शुभमन गिलने सर्वाधिक ९ धावांची खेळी केली तर विराट कोहलीने ८८ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ८२ धावा केल्या. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाने ५ खेळाडूंना आपली शिकार बनवली.
दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाची सुरूवात डळमळीत झाली. तीन धावांत त्यांनी तीन विकेट पडले. त्यानंतर सातत्याने त्यांचे विकेट पडत होते. मोहम्मद शमीने पाच विकेट घेत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडली. तर मोहम्मद सिराजने तीन विकेट घेतल्या.