Tuesday, July 16, 2024
Homeदेशदिल्लीची हवा तीन वर्षांनंतर सर्वात खराब

दिल्लीची हवा तीन वर्षांनंतर सर्वात खराब

प्रदूषण कमी करण्यासाठी अँटी स्मॉग गनमधून पाण्याची फवारणी

नवी दिल्ली : दिल्लीतील हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत आहे. राजधानीतील हवेची गुणवत्ता तीन वर्षांनंतर ऑक्टोबरमध्ये सर्वात खराब नोंदवली गेली. ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी राजधानीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३२७ वर नोंदवला गेला. जो अजूनही सतत वाढत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२० मध्ये दिल्लीचा सरासरी एक्यूआय २५७ होता. याशिवाय, ऑक्टोबर २०२१ मध्ये एक्यूआय १७३आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये २१० नोंदवले गेले.

दुसरीकडे मुंबईतही परिस्थिती चांगली नाही. येथेही हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत आहे. मुंबई वायू प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत सूचना जारी केली आहे. यामध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम , टाटा पॉवर आणि इतर कंपन्यांना त्यांचे उत्पादन अर्ध्यावर कमी करण्यास सांगितले आहे. शास्त्रज्ञांनी वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते कमी पाऊस हे प्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये केवळ एकाच दिवशी ५.४ मिमी पाऊस झाला. तर ऑक्टोबर २०२२2 मध्ये ६ दिवस १२९ मिमी तर ऑक्टोबर २०२१मध्ये ७ दिवस १२३ मिमी पाऊस पडला होता.

दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये जाळणे हे देखील प्रदूषण वाढण्याचे एक प्रमुख कारण मानले जात आहे. हरियाणा आणि पंजाबसह देशाच्या उत्तरेकडील भागात अद्यापही रान जाळण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि आसपासच्या परिसरात हवेत धुके वाढत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -