Friday, July 19, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023VIDEO: शुभमन गिलचे शतक हुकले, साराला झाले दु:ख, व्हायरल झाली प्रतिक्रिया

VIDEO: शुभमन गिलचे शतक हुकले, साराला झाले दु:ख, व्हायरल झाली प्रतिक्रिया

मुंबई: शुभमन गिल(shubman gill) आणि सारा तेंडुलकर(sara tendulkar) यांच्यातील रिलेशनच्या चर्चा सतत होतच असतात. आज पुन्हा एकदा सारा-शुभमनची चर्चा सुरू झाली आहे तीही भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलने कमालीची फलंदाजी केली. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने आपली विकेट पटकन गमावली. यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिलने मोर्चा सांभाळला. शुभमन गिल वर्ल्डकपमधील आपले शतक ठोकण्याच्या एकदम जवळ होता मात्र तो एका खराब शॉटची शिकार ठरला. यानंतर सारा तेंडुलकरची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

शुभमन गिलने या सामन्यात सावध फलंदाजी केली. मात्र अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने गिअर बदलला. गिलने ९२ बॉलमध्ये ९२ धावा केल्या. या खेळीदरम्यान ११ चौकार आणि २ शानदार षटकारही ठोकले. गिलच्या बॅटमधून जशा धावा निघत होत्या. तसतसे स्टेडियममध्ये सारा तेंडुलकर जोरदार टाळ्या वाजवत होती. मात्र जसे गिलचे शतक अवघ्या ८ धावांनी हुकले तसे सारा तेंडुलकर निराश झालेली पाहायला मिळाली. सारा तेंडुलकरची प्रतिक्रिया दिलेला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे.

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर नुकतेच एकत्र दिसले होते. सामन्याच्या आधी शुभमन आणि सारा मुंबईत जिओ वर्ल्ड प्लाझाच्या लाँच दरम्यान एकत्र दिसले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सारा तेंडुलकर आणि शुभमन दिल जिओ वर्ल्ड प्लाझाच्या इव्हेंटमधून बाहेर येताना दिसत होते. कॅमेरामनला पाहताच दोघेही तेथे थांबले आणि वेगवेगळे बाहेर निघाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -