Sunday, July 7, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023World Cup 2023: आज पाकिस्तान करणार भारताच्या विजयाची प्रार्थना

World Cup 2023: आज पाकिस्तान करणार भारताच्या विजयाची प्रार्थना

मुंबई: भारताच्या यजमानपदाखाली खेळवल्या जात असलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये सेमीफायनलची शर्यत आता अधिकच रंजतदार होत चालली आहे. द. आफ्रिका आणि भारतीय संघ १२-१२ गुणांसग सेमीफायनलमध्ये पोहोचले आहे. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी आता बाकी ७ संघांमध्ये चुरस लागली आहे.

बांगलादेशचा संघ आधीच स्पर्धेबाहेर गेला आहे. मात्र यातच पाकिस्तानचा संघ हळूहळू सेमीफायनलसाठी आपला रस्ता शोधत आहे. दरम्यान, त्यांची सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. त्याला आपले सामने जिंकण्यासोबतच भारत आणि अफगाणिस्तानसह इतर संघाच्या विजय-पराभवावर अवलंबून राहावे लागेल.

श्रीलंकेला हरवताच भारत सेमीफायनलमध्ये

आज भारताचा महत्त्वाचा श्रीलंकेविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दुपारी २ वाजल्यापासून हा सामना सुरू होईल. भारतीय संघाने हा सामना जिंकला तर त्यांचे सेमीफायनलमधील स्थान पक्के होईल. मात्र श्रीलंकेला आपला गाशा गुंडाळावा लागेल.

अशातच पाकिस्तानचा संघ भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. श्रीलंका स्पर्धेबाहेर गेल्यास पाकिस्तान सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊळ टाकेल. याआधी १ नोव्हेंबरला द. आफ्रिकाने न्यूझीलंडला १९० धावांनी हरवत पाकिस्तानला जबरदस्त मदत केली. न्यूझीलंडच्या हरण्याने पाकिस्तानला मोठा फायदा झाला.

पाकिस्तानचे चाहते प्रार्थना करत आहेत की न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघानी आपले सामने गमावावेत. तसेच पाकिस्तानला आपले उरलेले दोनही सामने जिंकणे गरजेचे आहे. जर ते यापैकी एकही सामना जरी हरले तरी ते सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -