Thursday, July 3, 2025

नेरळ-माथेरान मिनीट्रेन ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार

नेरळ-माथेरान मिनीट्रेन ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार

नेरळ : हिवाळ्याला सुरुवात होताच मुंबईकर पर्यटकांना वेध लागतात ते मुंबईपासून अगदी २ तासांच्या अंतरावर वसलेल्या माथेरान हिल स्टेशनचे. नेरळहून माथेरानला घेऊन जाणाऱ्या मिनीट्रेनचे लहान-मोठ्या साऱ्यांनाच आकर्षण आहे. पावसाळ्यामुळे चार महिने बंद असलेली ही मिनी ट्रेन आता ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे.


दिवाळीच्या सुट्ट्या लवकरच सुरु होणार असल्यामुळे माथेरानच्या निसर्गाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी मिनी ट्रेन सुरु झाल्याने चांगली खुशखबर मिळाली आहे.

Comments
Add Comment