श्रीलंकेविरुद्ध मोहम्मद शमीने ५ विकेट घेत रचला इतिहास, भारतासाठी असे करणारा ठरला पहिला गोलंदाज

मुंबई: वानखेडे स्टेडियममध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजांचा कहर पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर जसप्रीत बुमराहने भारताला यश मिळवून दिले. यानंतर सिराजने एका षटकात दोन विकेट घेत टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली. मोहम्मद शमीने तुफानी गोलंदाजी करताना पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये धाडले.

मोहम्मद शमीने पाच श्रीलंकेच्या फलंदाजांना बाद करत वर्ल्डकपमध्ये इतिहास रचला. शमी भारतासाठी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद शमीने १४ डावांत ४५ विकेट घेतल्या आहेत. त्याने झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांचा रेकॉर्ड तोडला. जसप्रीत बुमराहने वर्ल्डकपच्या करिअरमध्ये ३३ विकेट घेतल्या आहेत.

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज


४५- मोहम्मद शमी
४४- झहीर खान
४४-जवागल श्रीनाथ
३३ - जसप्रीत बुमराह
३१- अनिल कुंबळे

विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक ४ विकेट घेणारे गोलंदाज


मोहम्मद शमी - ७(१४ डाव)
मिचेल स्टार्क - ६(२४ डाव)

या ५ फलंदाजांना केले बाद


मोहम्मद शमीने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये कहर केला. आपल्या पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर असलंकाला बाद करत पहिली विकेट घेती. पुढच्याच बॉलवर दुष्मंथा हेमंथाला बाद करत दुसरी विकेट घेतली. ११व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर चमिराला बाद करत तिसरी विकेट घेतली. १३व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अँजेलो मॅथ्यूजला बाद करत चौथे यश मिळवले. १७व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रजिथाला बाद करता पाचवे यश मिळवले.
Comments
Add Comment

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल